जत,प्रतिनिधी: जत तालुक्यातील निगडी खुर्द येथील तीनपानी जुगार अड्ड्यावर जत पोलिसांनी छापा टाकून 2 लाख 77 हाजार 100 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला.याप्रकरणी 4 जुगाऱ्यांना ताब्यात घेतले आहे. तर चार फसार झाले आहेत.याबाबतचा गुन्हा जत पोलिसात दाखल झाला आहे.राजू परगोंडा पुजारी(वय-38),सोमाण्णा चंन्नमण्णा पुजारी(वय-48,दोघे रा.गुड्डापूर),सुभाष तुकाराम हुवाळे(वय-47,रा.निगडी खुर्द),नामदेव कृष्णा साळे(वय-38,रा.काराजनगी) यां जुगाऱ्यांना पोलिंसानी ताब्यात घेतले आहे. तर राजू मोटे(रा.घेरडी) व अन्य अनओळखी तिघे फसार झाले आहेत. याप्रकरणी राजू कांबळे यांनी फिर्याद दिली.
अधिक माहिती अशी, निगडी खुर्द गावातील लक्ष्मण गुराप्पा चंदनशिवे यांच्या मालकीच्या जमिनीतील पञ्याच्या शेडमध्ये बेकायदा तीनपानी जुगार खेळत असल्याची गोपनीय माहिती जत पोलिसांना मिळाली होती. त्या आधारे पोलिसांनी बुधवारी रात्री 8 वाजता छापा टाकला. त्या आठ जुगारे बेकायदा तीनपानी जुगार खेळत होते.त्यातील चारजणांना पोलिंसानी पकडताच बाकीचे 4 त्यापैंकी तिन अनओळखी अंधाराचा फायदा घेऊन फसार झाले आहेत.छाप्यात 5 दुचाकी,5 मोबाईल,रोख रक्कम 8,900,जुगाराचे साहित्य असा 2 लाख 77 हाजार 100 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. वाढत्या बेकायदेशीर जुगाऱ्यांना या कारवाईमुळे चाफ बसणार आहे. जत पोलिसांनी ही मोठी कारवाई केली आहे.
पोलिस निरिक्षक राजू तासीलदार यांच्या मार्गदर्शनाखाली सा.पोलीस निरिक्षक सचिन गढवे, आप्पासाहेब कत्ते,पो.हे.कॉ.भोर,सचिन जवजंवाळ,गोपाल राठोड,अभिजित यमगर यांच्या पथकाने कारवाई केली. अधिक तपास पोलिस निरिक्षक राजू तासीलदार करत आहेत.





