गुड्डोडगी,सांवत यांच्यातील वादात भाजपचा संबध नाही : आ.विलासराव जगताप

0
6

जत,प्रतिनिधी : भाजपचे तालुकाध्यक्ष चंद्रकांत गुड्डोडगी व नगरसेवक उमेश सांवत यांच्यात झालेला वाद हा त्यांच्या व्यक्तिगत व्यवसायातून असून त्याचा भाजप पक्षाशी कोणत्याही स्वरूपाचा संबध नाही.पक्षाकडून त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार आहे.अशी माहिती आमदार विलासराव जगताप व भाजप नेते डॉ. रविंद्र आरळी यांनी पत्रकार बैठकीत दिली.
आ.जगताप व डॉ.आरळी पुढे म्हणाले, गुड्डोडगी व सांवत यांच्या गेल्या आठवड्यात व्हसपेठ नजिक हाणामारी झाली आहे. ती त्यांचे व्यक्तिगत वादातून झाली आहे. पक्षाशी त्यांचा कोणताही संबध नाही.त्यामुळे भाजपची बदनामी थांबवावी.गुड्डोडगी, सांवत यांचा अहवाल पक्ष निरिक्षकाकडे पाठविला आहे. त्याच्या पक्ष निरिक्षकाकडून शिस्तभंगाची कारवाई होईल.सध्या गुड्डोडगी व सांवत यांच्या वादामुळे बदनामी होत आहे. मात्र प्रत्यक्षात त्यांच्यात वाद व्यावसायिक स्पर्धेतून झाला आहे.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here