पुन्हा शेगाव दारू विक्रीच्या केंद्रस्थानी
जत,प्रतिनिधी: शेगाव ता.जत येथे बेकायदेशीर दारू वाहतूक करणाऱ्या वाहनासह दारू अड्ड्यावर छापा टाकून 8 लाख,69,हाजार 512 रुपयाची देशी-विदेशी दारू व दोन वाहिने जप्त करण्यात आली. विभागीय उप- आयुक्त कोल्हापूर विभाग यांचे आदेशान्वये व अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क सांगली यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क मिरज आनंद पवार यांच्या पथकाने कारवाई केली. याप्रकरणी दोन सशयिंतानी पोलिंसानी ताब्यात घेतले आहे. शुक्रवारी शेगाव येथे ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी उत्पादन शुल्क विभागाकडे गुन्हा दाखल झाला आहे.
अधिक माहिती अशी, जत तालुक्यातील शेगाव येथून बेकायदेशीर देशी-विदेशी दारूचा साठा करून परिसरीतील गावात विकली जात असल्याचे माहिती उत्पादन शुल्कच्या मिरज विभागाला खबऱ्याद्वारे मिळाली होती. त्या आधारे हा छापा टाकला. त्यात देशी 307,विदेशी 307 बॉटल दारू सापडली आहे.त्यांची वाहतूक करण्यासाठी वापरणारी टाटा एस,महिंद्र टेम्पो असा 8,69,512 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईत निरिक्षक आंनद पवार,कॉन्स्टेबल उमेश निकम,युवराज कांबळे, करण सरवदे,स्वप्नील कांबळे, श्रीमती प्रतिभा पाटील, मदने यांनी सहभाग घेतला.
जत तालुक्यातील शेगाव येथे बेकायदेशीर दारू वाहतूक करणाऱ्या वाहनासह मोठा देशी-विदेशी दारूचा साठा जप्त करण्यात आला.





