संख,वार्ताहर: वैराग्य संम्पन्न परम पूज्य श्री.सदगुरु बागडे बाबा यांच्या 24 व्या पुण्यतिथी चिक्कलगी भुयार ता. मंगळवेढा येथे सप्ताह संपन्न होत आहे. मठाचे मठाधिपती ह.भ.प.तुकाराम बाबा यांच्या वतीने गणेश उत्सव मंडळांना मोफत 75 गणेश मूर्तीचे वाटप करण्यात आले. संत सदगुरू बागडे बाबा यांची 24 वी पुण्यतिथी निमित्त 8 तारखेपासून विणा उभा करून सप्ताहास सुरूवात झाली आहे.
या भागातील संत व संत गाडगेबाबा यांचे शिष्य म्हणून त्यांची ओळख आहे.किर्तनाच्या माध्यमातून त्यांनी समाजप्रबोधनाचे श्रेष्ठ काम केले. संसार करत परमार्थ कसा करावा तसेच समाजातील कित्येक शेकडो लोकांना व्यसनापासून मुक्त केले. साधी राहणी उच्च विचारसरणी असा त्यांचा राहणीमानाचा दर्जा होता. हजारो भाविक आज त्यांच्या पुण्यतिथी सप्ताहास येतात. सप्ताहात ज्ञानेश्वरी पारायन वाचन ,भजन,किर्तन,प्रवचनाचे आयोजन केले जाते. येणाऱ्या भाविकांना नाष्टा, भोजनाची सोय असते. शनिवार दि.15 संप्टेबरला दुपारी 1 वाजता फुले,गुलाल,व त्यानंतर महाप्रसाद घेऊन कार्यक्रमाची सांगता होईल.ग्रामीण भागातील गणेश मंडळाना आर्थिक मदत म्हणून तुकाराम महाराज यांच्याकडून पुण्यतिथीचे औचित्य साधून गणेश मुर्त्या देण्यात येतात.
सार्वजनिक मंडळानी सामाजिक बांधिलकी जपत समाजउपयोगी सांस्कृतिक कार्यक्रम राबवावेत.न्यायालयाच्या आदेशानुसार डॉल्बी मुक्त,व्यसनमुक्त गणेशोत्सव साजरा करावा.गणेश मंडळाचे चांगले कार्य संत बागडे बाबा सप्ताहाचा उद्देश सफल करेल.
ह.भ.प.तुकाराम महाराज,मठाधिपती चिक्कलगी भुयार मठ
ह.भ.प.तुकाराम बाबा यांच्या वतीने परिसरातील 75 गणेश मंडळाना गणेश मूर्तीचे वाटप करण्यात आले.





