जत,प्रतिनिधी : गणेशोत्सव व मोहरमच्या पार्श्वभुमीवर जत पोलिस सतर्क झाले आहेत. कायदासुव्यस्था आबाधित रहावी यासाठी जत शहरातील रेकार्ड वरील गुन्हेगार दत्ता प्रमोद साबळे(वय-32),लखन चंद्रकात पाथरुट (वय-26,दोघेही रा.विठ्ठल नगर जत)यांना पोलिंसानी अटक करून न्यायालयात उभे केले असता त्यांना न्यायालयाने 21 संप्टेबरपर्यत स्थांनबध्द करत न्यायालयीन कोठडीत रवानगी केली.तालुक्यातील अशा स्वरूपाची गुन्हेगारावर पहिलीच कारवाई अाहे.त्यामुळे रेकार्ड वरील गुन्हेगारांना वचक बसेल अशी माहिती पोलिस निरिक्षक राजू तासीलदार यांनी दिली.
जत तालुक्यातील गुन्हेगाराने सणासुदीच्या काळात कायदा सुव्यवस्था बिघडू नये यासाठी जतचे पोलिस निरिक्षक राजू तहसिलदार हे सतर्क झाले आहेत. नुकतेच त्यांनी बाज व जत मधील सुमारे 42 जणांना 15 दिवसासाठी तालुक्यातून हद्दपार केले आहे. त्याच बरोबर गावागावात दक्षता बैठका घेऊन गणेशोत्सव व मोहरम शांततेत साजरा करण्याचे आवाहन केले आहे.
तरीही उपाययोजना म्हणून रेकार्ड वरील सुमारे 20-25 गुन्हेगारावर कारवाईचा बडगा उगारला आहे.त्यातिल दोन गुन्हेगारांना ताब्यात घेऊन न्यायालयात हजर केले.न्यायालयाने त्यांना 21 संप्टेबरपर्यत स्थांनबध्द करत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
त्याशिवाय बाज सह तालुक्यातील हद्दपार गुन्हेगार हद्दपार काळात तालुक्यात आढळून आल्यास त्यांच्यावर 144/2 नुसार अशीच कारवाई करून स्थांनबध्दची करण्यासाठी न्यायालयात उभे केले जाईल असे यावेळी पोलिस निरिक्षक राजू तहसिलदार यांनी सांगितले. गणेशोत्सवाच्या पार्श्वभुमीवर जतच्या डिवायएसपी म्हणून शर्मिला वालावलकर यांनी पदभार स्विकारला आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व सण शांततेत साजरे करण्यासाठी पोलीस यंत्रणा कामाला लागल्याचे तासीलदार यांनी सांगितले



