जत | भाजप तालुकाध्यक्षावर नगरसेवकाकडून प्राणघातक हल्ला,घटना राजकीय की वाळू व्यवसायातून ? उलटसुलट चर्चेला उधान

0
5

जत,प्रतिनिधी : भाजप तालुकाध्यक्ष चंद्रकांत शंकरेप्पा गुड्डोडगी(वय-40,रा.सिध्दार्थ कॉलनी)यांची व्हसपेठ पासून तीन किलोमीटर अंतरावर चारचाकी गाडी अडवून गाडीची मोडतोड करत भाजपचे जत नगरपरिषदेचे नगरसेवक उमेश सांवत व अन्य तिघांनी प्राणघातक हल्ला करून जिवे मारण्याचा प्रयत्न केला.त्यात गुड्डोडगी गंभीर जखमी झाले आहेत. उपचरानंतर गुड्डोडगी यांनी जत पोलिसात फिर्याद दिली आहे.घटना बुधवारी पहाटे तीन वाजता घडली. उमेश सांवत,अमिर(पुर्ण नाव नाही) व अन्य एका अनओळखी इसमाविरोधात जत पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिसाकडून मिळालेली माहिती अशी,भाजपचे तालुकाध्यक्ष चंद्रकात गुड्डोडगी,भाजप युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष सुनिल वास्टर(वय-38,रा.जत) हे गुड्डोडगी यांच्या टाटा सफारी मोटारीतून(क्र.एमएच-10,बीएम-4392) बालगाव येथे कार्यक्रमासाठी गेले होते.तेथील कार्यक्रम संपवून रात्री उशिराने जतकडे येत होते.व्हसपेठ डोंगरात उमेश सांवत व अन्य दोघे अगोदर विना क्रंमाकाची चारचाकी गाडी घेऊन दबा धरून थांबले होते. गुड्डोडगी यांची गाडी येताच त्यांनी गाडी अडवत हल्ला केला.गाडीवर दगडफेक करण्यात आली.त्यात गुड्डोडगी यांना गाडीबाहेर काढत काठीने, डोके,माण,व पाठीवर काठीने गंभीर मारहाण केली. त्यात गुड्डोडगी गंभीर जखमी झाले आहेत.सांवतसह तिंघानी गुड्डोडगी यांना जिवे मारण्याचा प्रयत्न केला. तर वास्टर यांनाही मारहाण झाली आहे.हल्ल्यात गुड्डोडगी यांच्या टाटा सफारी गाडीच्या काचा फोडून 60 हाजार रूपयाचे नुकसान केले आहे.
गुड्डोडगी यांच्यावर जत येथील खाजगी दवाखान्यात उपचार सुरू आहे.शनिवारी उपचारानंतर जत पोलिसात फिर्याद दिली. पुढील तपास पोलिस उपनिरक्षक रणजिंत गुंडरे करत आहेत.
दोन्ही भाजपचे पदाधिकारी व सुसलाद ता.जत येथील असल्याने नेमके वाद कशातून झाला याबाबत उलटसुलट चर्चा सुरू आहे.दोघांत स्थानिक राजकीय वैरत्व आहे.त्याशिवाय दोघाचेही वाळू व्यवसाय असल्याने व्यवसायातील संघर्षातून ही घटना घडल्याची चर्चा तालुक्यात सुरू आहे.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here