हिवरे | नजिकच्या म्हैशाळ कँनॉलवर पुल बांधकामासाठी मातीमिश्रीत वाळूचा वापर |

0
7

हिवरे,वार्ताहर: हिवरे (ता.जत)येथे म्हैशाळ सिंचन योजनेच्या कँनॉल वरर्ती बांधण्यात येत असलेल्या पुल बांधकामासाठी दर्जाहीन वाळूचा वापर होत आहे. ओढ्यातून आणलेली निव्वळ मातीच घालून होत असलेले हे पुलाचे काम यावरून जाणाऱ्या नागरिकांच्या जिवावर बेतणारे आहे.यांची तपासणी करून चांगल्या वाळूद्वारे काम व्हावे अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे.

भाजप तालुकाध्यक्षावर नगरसेवकाकडून प्राणघातक हल्ला

हिवरे गावाजवळील शिंदे व डोंबाळे वस्तीला जाणाऱ्या म्हैशाळ योजनेचा पोट कँनॉल वरती पायदळी पुलाचे बांधकाम सुरू आहे.यात मातीमिश्रीत वाळूचा वापर सुरू आहे. यामुळे पुलाचे काम कुमकवत होऊन धोकादायक होणार आहे. बांधकामालगत टाकलेल्या मातीमिश्रीत वाळूच्या ढिगाबाबत संबधित ठेकेदाराच्या अधिकाऱ्यांनी जाब विचारला असता वाळू मिळत नसल्याने असली वाळू वापरावी लागत असल्याचे सांगितले.पुलाचे काम दर्जेदार होणार असल्याचे येथील अधिकाऱ्यांनी काही नागरिकांना सांगितले.मात्र माती घालून बांधलेला पुल बांधकाम कोणत्या नियमात बसते.व हे बांधकाम किती दिवस टिकाणार यावर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालून चौकशी करावी अशी मागणी आहे. 

हिवरे : म्हैशाळ सिंचन योजनेच्या पोट कँनॉल वरती पुल बांधकामासाठी आणलेली मातीमिश्रीत वाळू

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here