जत | जमिनीच्या वादातून सिध्दनाथ येथील दोघावर प्राणघातक हल्ला |

0
5

जत,प्रतिनिधी: सिध्दनाथ ता.जत येथील परमेश्वर भिवरा कोकरे(वय-27) त्यांना व त्यांच्या आईस शेतजमिनीच्या वादातून आठ जणांनी गंभीर मारहाण करून जखमी केल्याची फिर्याद जत पोलिसात दाखल झाली आहे.
अधिक माहिती अशी,सिध्दनाथ येथे कोकरे कुंटूबियात वाद आहे. त्यातून ता.7 संप्टेबरला सायकांळी 4.15 वाजता शेतात विजची केबल बाजूला का ठेवलीस म्हणून परमेश्वर व त्यांच्या आईस आठ जणांनी मारहाण केली.यात परमेश्वर गंभीर जखमी झाले असून जत येथील खाजगी दवाखान्यात उपचार सुरू आहेत.याप्रकरणी भिवा नामदेव कोकरे,नामदेव विठोबा कोकरे, बिरा मनगेणी कोकरे,बिरा कोकरे(व त्यांचा मामा),लिलाबाई नामदेव कोकरे, सरिता दत्तात्रय कोकरे,उमाबाई मनगेणी कोकरे (सर्व रा.सिध्दनाथ)यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here