नवविवाहते गळपासाने आत्महत्या

0
7

जत,प्रतिनिधी: अचकनहळ्ळी ता.जत येथील नवविवाहतेने घरात कोणी नसल्याचे पाहून गळपासाने आत्महत्या केली.ज्योती शामराव कुंभार (वय-19,मुळ गाव-कद्दळी,जि.सोलापुर) असे मयत विवाहतेचे नाव आहे.याबाबतचा गुन्हा जत पोलिसात दाखल झाला आहे.
अधिक माहिती अशी, अचकनहळ्ळी येथील शामराव कुंभार यांच्याशी ज्योती हिंचा दीड वर्षापुर्वी विवाह झाला होता. शामराव जत येथील मनमंदिर को.ऑफ बँकेत नोकरी तर सासू-सासरे शेती करतात.
दररोज प्रमाणे शामराव बँकेत आले होते.सासू-सासरे शेतात काम करण्यासाठी गेले होते.घरात एकटीच असलेल्या ज्योतीने घराच्या दरवाज्याला आतून कडी लावून छताच्या अँगलला दोरीने गळपास लावून  आत्महत्या केल्याचे सासू-सासरे घरी आल्यानंतर निदर्शनास आले.अशी फिर्याद सासरे चंद्रकात चन्नाप्पा कुंभार यांनी जत पोलिसात दिली.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here