जत,प्रतिनिधी: बिंळूर ता.जत येथील दारू पिणाऱ्या एकास मज्जाव केल्याने मारहाण करून पावणेदोन तोळ्याची चेक पळवून नेहल्या प्रकरणी पोलिसांनी एका शंशियतास अटक करून न्यायालयात उभे केले असता न्यायाधिशानी त्याला तीन दिवसाची पोलिस कस्टडी सुनावली.
अधिक माहिती अशी, प्रकाश रामू डोणी हे गावातील भिंतीआडून येत असताना महानतेंस गुंडाप्पा धोडमनी हा आडोशाचा फायदा घेऊन दारू पित होता.त्याला प्रकाश यांने इथही सीसीटिव्ही कँमेरा लावावे लागणार असे म्हटल्याने महानतेंस यांने प्रकाशला लाथाबुक्याने गंभीर मारहाण करून जखमी करत गळ्यातील पावणेदोन तोळ्याची चैन पळवून नेहली होती.जखमी प्रकाश यांने उपचार घेऊन जत पोलिसात तक्रार दिली होती. त्यावर तपासअधिकारी सा.पोलिस निरिक्षक रणजिंत गुंडरे यांनी आरोपी अटक करत न्यायालयात उभे केले होते.





