जत, प्रतिनिधी : वज्रवाड ता.जत येथील तुकाराम भाऊ बामणे यांच्या मालकीचे बामणे किराणा स्टोअर्स व फोटो ग्राफर्स या दुकान चोरट्यांनी फोडून 48 हाजार 310 रूपयाचा मुद्देमाल लंपास केला.घटना 3 संप्टेबरला मध्यंतरीच्या सुमारास घडली. याबाबतची तक्रार जत पोलिसात दाखल झाली आहे.
बामणे यांचे वज्रवाड येथे मध्यवर्ती चौकात दुकान आहे. दरदिवशी प्रमाणे बामणे आपले दुकान बंद करून घरी गेले होते.मध्यरात्री चोरट्यानीं शटर उचकटून दुकानात प्रवेश करत दुकानातील दोन निकॉन कंपनीचे कॅमेरे, किराणा माल असे 48 हाजार 310 रूपयाचा मुद्देमाल लंपास केला.





