जत | वाढदिवसाच्या अनावश्यक खर्चाला वाचवून अंभियत्याकडूंन 100 वृक्षाची लागवड |

0
10

जत,प्रतिनिधी: जत येथील अभिंयते असणारे महेश कोळी यांनी वाढदिवसाच्या अनावश्यक खर्चाला फाटा देत अंबाबाई मंदिर परिसरात सुमारे 100 वेगवेगळे वृक्ष लागवड करून सामाजिक बांधिलकी जपली.
जत शहरात सत्यदिप कट्रक्शन ही बांधकाम व्यवसायातील कंपनी चालवितात.त्या माध्यमातून त्याचे सतत सामाजिक उपक्रम राबवून समाजहितासाठी प्रयत्न करतात.त्यांच्या वाढदिनीही त्यांनी वेगळेपण जपले.साधेपनाने वाढदिवस साजरा करत उरलेल्या पैशातून वृक्ष लागवड करून निसर्ग जपण्याचे काम केले आहे.अंबाबाई मंदिर परिसरात 40 सिताफळ,40 गुलमोहर,20 चिंच असे शंभर वृक्ष लावण्यात आले आहेत. त्यांच्या संगोपनासाठी आम्ही सतत वृक्षाची काळजी घेणार आहोत असे कोळी यांनी सांगितले.
यावेळी माजी नगरसेवक महादेव कोळी,व्यापारी प्रसाद कंगोणी,अभिंयता पिंटू कोळी,सद्दाम इनामदार, समर्थ पवार,डॉ.संदिप तुळजानावर,डॉ.निलेश नंनवरे,रामचंद्र कोळी,अभिषेक कोळी,अदिनाथ औरसंगे,सचिन तंगडी,शाहरूख मुल्ला आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी बोलताना महेश कोळी म्हणाले,वाढदिवस साजरा करण्याबरोबर वृक्ष लागवडीसारखे निसर्ग जपण्याचे काम तरूणाकडून व्हावे,निसर्ग टिकला तर आपण टिकू,त्यामुळे अशी वृक्ष लागवड केली आहे. इतर तरूणांनीही अशा पध्दतीने उपक्रम राबवावेत.

सत्यदिप कट्रक्शनचे संचालक महेश कोळी यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्ष लागवड करण्यात आली.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here