परिसराची स्वच्छता,रब्बी हंगामापासून पिक लागवडी होणार
जत,प्रतिनिधी: जत विभागीय कृषी कार्यालयाच्या असणाऱ्या 56 एकर जागेत आता तालुका बिजगुणन केंद्र तथा तालुका रोपवाटीकाचा प्रयोग राबविला जाणार आहे. जतचे विभागीय कृषी अधिकारी कांताप्पा खोत यांच्या पुढाकारातून कृषी विभागाची सुमारे 56 एक जमीन जलयुक्त शिवार योजनेतून पिक लागवडी योग्य करण्यात आली आहे.कंपार्टमेंट बिल्डिंग, शेत तलाव अशी कामे करून पाणी पातळी वाढविण्यासाठी प्रयत्न केला आहे.जत तालुक्यातील प्रत्येक मंडलातील पिकांचे बिजगुणन व त्यांचे उत्पादन,किडरोग यांचे प्रात्याक्षिक त्या परिसरीतील शेतकऱ्यांना दिले जाणार आहे. त्याशिवाय येथे बहरलेल्या शेतीतून कसे उत्पन्न वाटेल,दर्जेदार पिक पध्दतीची माहिती देणारे शेती पर्यटन स्थंळाची निर्मिती येथे केली जाणार आहे.
जत कृषी कार्यालय लगत कृषी विभागाची सुमारे 56 एकर जमिन पडिक पडली होती.संपुर्ण जमिनीवर काटेरी वनस्पती वाढल्या होत्या.कुठेही जलसंधारण झाले नसल्याने पडलेले पाऊसाचे पाणी वाहून जात होते.त्यामुळे उन्हाळ्यात पाणी टंचाई जाणवत होती.त्यामुळे जमिनीच्या काही भाग वगळता संपुर्ण जमिन पडिक पडली होती.जमिनीत क्षांराचे प्रमाण वाढले होते.त्यामुळे रोपे जगत नव्हती. जतचे भुमिपुत्र असलेले कांताप्पा खोत यांनी जत विभागीय कृषी अधिकारी या पदाचा कार्यभार घेतला.गेल्या सहा महिन्यात खोत यांनी तालुक्यातील शेतकऱ्यांना संमृध्द करत कायपालट करण्याचे नियोजन आखले आहे.त्याची सुरूवात खोत यांनी आपल़्या कार्यालयापासून केली आहे. कारण आपल्या कार्यालयाच्या आवारातील जमिनी त्यांनी स्व:ताच्या जमीनीकडे दुर्लक्ष करून कार्यालयाची जमीन वापरात आणली आहे. जलयुक्त शिवार योजनेचा योग्य वापर करत त्यांनी जत शहरातील ओढे स्वच्छ केलेच त्याचबरोबर कृषी विभागाच्या या जमिनीत जलयुक्त शिवार अभियान,अग्रो फॉर स्ट्री योजना 2018 या योजनातून परिसरातील स्वच्छता केली.त्याशिवाय खोत यांनी तब्बल पंधरा दिवस समोर उभे राहून सर्व क्षेत्रावर कंपार्टमेंट बंडीग,नाला खोलीकरण, शेततळे,जुनी विहिर,शेततळ्याची दुरूस्ती करत मोठे जलसंधारणाचे काम केले आहे. या शेतीत पिकणारी पिके आता कृषी मार्गदर्शक बनणार आहेत.कृषी अधिकारी खोत यांनी राबविलेल्या या योजनेतून परिसर सुंदर केला आहे. जमिनीत पावसाचे पाणी आता मुरणार असल्याने क्षाराचे प्रमाण कमी होऊन शेती बहरणार आहे.मंडलानुसार घेतली जाणारी सर्व पिके लावण्याचे नियोजन केले आहे. रब्बीपासून येथे पिकांची लागवड होईल. त्यासाठी संपुर्ण परिसरात नागरंणी करण्यात आली आहे.शेततळ्यामुळे बारामाही पाण्याची सोय होणार आहे. तालुक्यातील मंडल भागातील सर्व पिके येथे घेण्यात येणार आहे.त्यांचा संपुर्ण लागवडीचा खर्च अधिकाऱ्यांनी स्व:ताच्या खिशातून घालायचा आहे.तो पिक आल्यानंतर काढून घेऊन नविन पिके घेण्यासाठी उत्पन्न बाजूला ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे तालुक्यातील पर्यटनस्थंळ म्हणून जतचे नाव आणण्यासाठी जत कृषी विभाग कात टाकत आहे.
जत तालुक्यातील भौगोलिक परिस्थितीनुसार येथे प्रत्येक मंडलातील पिकांची येथे बिजगुणंन व प्रात्याक्षिक येथे शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे. तालुक्यातील सर्व प्रमुख पिकाचे शेती,अत्याद्यावत रोपवाटीका लावून शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जाणार आहे.त्याशिवाय येथे लावलेल्या पिकांचे संगोपन कोणताही कामगार न लावत त्या मंडलातील अधिकारी, कर्मचारी यांनी करावयाचे आहे.या कृष्ठदायी कामामुळे सर्वाचे आरोग्य ही सुदृढ बनणार आहे.
-कांताप्पा खोत, विभागीय कृषी अधिकारी, जत
जत कृषी कार्यालयाची पेरणी योग्य केलेली शेती





