जत,प्रतिनिधी: रविवारी झालेल्या कॉग्रेसच्या जनसंघर्ष यात्रेत जतची जागा कॉग्रेसला मिळणारचं व विक्रमसिंह सांवत कॉग्रेसचे उमेदवार असतील अशी घोषणा प्रदेशाध्यक्ष अशोकराव चव्हाण यांनी केली.त्यावर कॉग्रेस-राष्ट्रवादी आघाडी होईल असे सांगितले होते.मात्र जत तालुक्यात कॉग्रेस-राष्ट्रवादीचे मनोमीलन होण्याचे संकेत दिसत नसल्याचे सोशल मिडीयावर टाकलेल्या काही कमेंटवरून वाटत आहे. राष्ट्रवादीत जाऊ इच्छिंत एका जबाबदार नेत्यांने त्यासंदर्भातील एक पोस्ट वॉटस्अपच्या काही ग्रुपवर टाकल्याने पुन्हा चर्चेला मार्ग सापडला आहे.त्यात म्हटले आहे, जतची जागा राष्ट्रवादीकडे आहे.राष्ट्रवादीची ताकत राज्यात वाढली असल्याने यापुढे सर्वाधिंक उमेदवार राष्ट्रवादीचे असतील. त्याशिवाय जतची जागा राष्ट्रवादी लढवणार असल्याचे म्हटले आहे.
तिकिट वाटप निर्णयाचे सर्व अधिकार जिल्ह्याच्या नेत्याना आहेत.मात्र जतचे कॉग्रेस-राष्ट्रवादी नेते एकत्र येतील का?हे पाहणे औत्सुक्याचे आहे.