जत,प्रतिनिधी :जत शहरातील आनंद ग्राउंड येथे राहणाऱ्या प्रदीप ऊर्फ राजू सिदलिंगप्पा निंगणूर (वय- 40) या तरुणाने रविवारी पहाटे आपल्या राहत्या घरी दोरीने गळपास घेऊन आत्महत्या केली.
राजू निगनूर हा तरुण बांधकाम ठेकेदार म्हणून काम करीत होता पंरतू या व्यवसयात त्यास अपयश आल्याने तो निराश होता.याच निराशेतून त्याने रविवारी पहाटे घरातील लोक झोपी गेल्यानंतर वरच्या मजल्यावर खोलीत जाऊन छताच्या लोखंडी हुकास दोरी लावून आत्महत्या केली.राजू याने निराशेतून आत्महत्या केली असल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान, रविवारी सकाळी घरातील लोकांना ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांनी जत पोलिसांना याची माहिती दिली, जत ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.या प्रकरणी जत पोलिसात घटनेची नोंद झाली आहे.