जत,प्रतिनिधी:दोन माजी मुख्यंमञी, विरोधी पक्षनेते, माजी मंत्री, खासदार, आमदार, अनेक पदाधिकारी असा भव्य ताफा दुपारी कुंभारी येथे थांबला. अन् बघ्यांची गर्दी उसळली. फाईव्हस्टार चहाचा आस्वाद घेणाऱ्या काँग्रेस नेत्यांनी सर्वांना अचंबित केले.
पदाचा डामडाैल, थाटमाट विसरून त्यांनी बसस्टँडवरील एका चहाच्या टपरीवर ठिय्या मारला. सामान्य नागरिंकाच्या बरोबरीने गाड्यावर चहा पिला. तेव्हा खरचं हे जनतेचे सेवक आपल्यातलेच असल्याचा साक्षात्कार कुंभारीतील जनतेला झाला.
सामान्यांशी नाळ जोडलेले कॉग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखेपाटील, माजी मंत्री हर्षवर्धन चव्हाण, माजी मंत्री सतेज पाटील, आ.विश्वजित कदम यांनी कुंभारी येथील मनोज क्षीरसागर यांच्या स्टॅड नजिकच्या हॉटेल शिवशंकर येथे चहा घेत जनतेचे गाऱ्हाणे ऐकले.हे अगदी अविश्विनिय,अप्रतिम चित्र जनतेला भावणारे ठरले.जत तालुक्यात आलेल्या कॉग्रेसच्या जनसंघर्ष यात्रेचे कुंभारी येथे स्वागत करण्यात आले.
कुंभारी येथे कॉग्रेसच्या जनसंघर्ष यात्रेतील नेत्यानी जनतेच्या बरोबर चहाच्या गाड्यावर चहा आस्वाद घेतला.





