डफळापूर, वार्ताहर : सत्ताधारी भाजप सरकारच्या विरोधात जनतेच्या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी कॉग्रेसने जनसंघर्ष यात्रा काढली आहे. ती आज जत तालुक्यात येणार आहे.या रँलीत माजी मुख्यंमञी आ.पृथ्वीराज चव्हाण, खा.अशोकराव चव्हाण, कॉग्रेसचे प्रभारी खा.मल्लिकार्जून खर्गे,राज्यातील अनेक आजी-माजी मंत्री,सुमारे विद्यमान 20 आमदार उपस्थित राहणार आहेत.
जत तालुक्याचे मुख असणाऱ्या डफळापूर येथे यात्रेचे भव्य स्वागत करण्यात येणार आहे. त्याचबरोबर यात्रेतील सर्व नेते अंनतपूर रोडपासून गुरूवार पेठेतून रँलीने स्टॅड समोर येतील.तेथून संघर्ष यात्रा जतकडे रवाना होणार आहे. डफळापूर येथे संघर्षयात्रेचे कॉग्रेस नेते तथा बाजार समिती संचालक अभिजित चव्हाण, सोसायटीचे माजी चेअरमन मनोहर भोसले, पंचायत समिती सदस्य दिग्विजय चव्हाण,दत्त पतसंस्थेचे चेअरमन बाबासाहेब माळी व गावातील कॉग्रेस नेते स्वागत करतील.त्यांनतर जतेत रँलीने संघर्षयात्रा बाजार समिती येथे येणार आहे. तेथे भव्य सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
सरकारविरोधातील या संघर्षयात्रेची जत तालुक्यातील नेत्यांनी जोरदार तयारी केली आहे. कॉग्रेस नेते विक्रमसिंह सांवत यांनी संपुर्ण तालुका पिंजून काढत जनतेत जागृत्ती करून प्रचार केला आहे. त्यामुळे सरकार विरोधातील या संघर्षयात्रेला मोठ्या संख्येने नागरिंक उपस्थित राहणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शेतकरी व सामान्य जनतेविरोधातील चुकीच्या मुद्यावर आज कॉग्रेस नेत्याच्या तोफा धडाडणार आहेत.





