जत,प्रतिनिधी : तालुक्यातील रावळगुंडवाडी येथे शनिवारी दुपारी विजेचा धक्का लागून केदारी ऊर्फ गोपी बसवंत लांडगे,(वय 18)या तरुणचा जागीच मृत्यू झाला.
गोपी हा शनिवारी दुपारी शेतातील पिकांना पाणी देण्यासाठी गेला होता.त्यावेळी विद्युत पंपाची मोटर सुरू करण्यासाठी गेला. दिवसभर पावसाची रिमझिम असल्याने मोटरच्या डीपीमध्ये वीजेचा प्रवाह उतरला होता. गोपीने बटण दाबताच त्याला विजेचा जोरात दक्का बसला. पायात चप्पल नसल्याने व जामीन ओली असल्याने त्यास जोराचा धक्का लागून त्याचा जागीच मृत्यू झाला.याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत जत पोलिसात घटनेची नोद नव्हती.





