जत | निरंकारी मंडळाचे केरळ येथील मदत कार्यासाठी जिल्ह्यातुन 50 महापुरुष दाखल |

0
5

जत,प्रतिनिधी:संत निरंकारी मंडळाचे वतीने केरळ येथील मदत कार्यासाठी सांगली जिल्ह्यातुन 50 सेवादल महापुरुष, जिल्हाचे संत निरंकारी मंडळाचे क्षेत्रिय संचालक जगन्नाथजी निकाळजे यांच्या मार्गदर्शनाखाली दाखल झाले आहे.

      संत निरंकारी मंडळ हे आध्यात्म बरोबर स्वच्छता अभियान, रक्तदान शिबीर,मोफत आरोग्य शिबीर, नैसर्गिक आपत्तीक घटना यासारख्या अनेक  समाजकल्याणच्या सेवा कार्यात अग्रेसर आहे.यामुळे निरंकारी मंडळाला अनेक सामाजिक पुरस्काराने सन्मानित केले आहे.उतराखंड येथील प्रलयाच्या  वेळी ही मंडळाने मदत कार्य निस्वार्थ भावनेने सेवा करुन जनसेवा हीच ईश्वर सेवा ही शिकवण दिली.हेच निरंकारी मंडळाचे प्रतिक आहे.सांगली जिल्हातुनच नव्हे तर संपूर्ण देशभरातुनही मोठ्या संख्येने निरंकारी मंडळाचे सेवादल महापुरुष मदत कार्यासाठी उपलब्ध झाले आहेत.आपत्ती ग्रस्त भागातील कुंटुबीयांना मदत करत आहेत. जालिंदर जाधव,दत्ता जगताप,उतळे,विटा शाखेचे संभाजी माळी ,जतचे जोतिबा गोरे,संभाजी साळे यांचे यासाठी नियोजन केले आहे.

निरंकारी मंडळाचे केरळ येथील पुरग्रस्तांच्या मदत कार्यासाठी जिल्ह्यातुन दाखल झालेले महापुरूष अशी मदत करत आहेत.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here