जत,प्रतिनिधी : सांगली मध्ये लवकरच कलाकार व निर्माते यांच्या अडचणी दूर करण्यासाठी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ शाखा कार्यालय सुरू करण्यात येईल,असे प्रतिपादन अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळचे अध्यक्ष मेघराजे भोसले यांनी केले.
ते अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ व लायन्स क्लब जत यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कलाकार स्नेह मेळाव्यात बोलत होते. जत सारख्या अवर्षणग्रस्त तालुक्यात कलाकार स्नेह मेळावा आयोजित करण्यात आल्याचे समाधान त्यांनी व्यक्त केले.या मेळाव्यासह जतसह जिल्हा भरातून अनेक कलाकार यावेळी उपस्थित होते.
भोसले पुढे म्हणाले, ‘ग्रामीण भागातील कलाकारामधील सुप्त गुण हेरून त्यांना चांगल्या भुमिका देण्यासाठी दिग्दर्शकांंनी प्रयत्न करावेत. नवं नवीन दुर्लक्षित व नयनरम्य भाग प्रेक्षकांसमोर आणून वास्तविकता मांडवी. जत येथील लायन्स क्लबचे नूतन अध्यक्ष दिनकर पतंगे यांची महाराष्ट्र राज्य चित्रपट महामंडळ भरारी पथकपदी नियुक्ती करण्यात आली असून आपल्या अडचणी सोडवण्यासाठी ते प्रयत्नशील राहतील याची खात्री आहे. सर्व तरुण तरुणी व कलाकारांनी चित्रपट महामंडळाचे सदस्य व्हावे असे आवाहन त्यांनी केले. सांगली मध्ये लवकरच कलाकार व निर्माते यांच्या अडचणी दूर करण्यासाठी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ शाखा कार्यालय सुरू करण्यात येईल. कोणत्याही कलाकाराचे मानधन अथवा वेतन थकवल्यास संबधित निर्माता व दिग्दर्शक यांच्यावर कारवाई करण्याचा इशारा मेघराज भोसले यांनी दिला.
यावेळी महादेव जाधवर यांचे दिग्दर्शन असलेल्या ‘आकर्षण’ या मराठी चित्रपटाच्या पोस्टरचे अाणावरण व या चित्रपटात भूमिका असलेल्या कलाकारांचा सन्मान करण्यात आला.कॉलेज जीवनात प्रेमाविषयी आकर्षण असणे हे साहजिकच आहे.पण या कॉलेज दशेत तरुण तरुणींनी करिअर करावे की प्रेमाची रिस्क घ्यावी हे या चित्रपटात दाखवण्यात आले आहे.आकर्षण
करिअर की रिस्क असे या चित्रपटाचे नाव आहे. कॉलेज तरुण तरुणींवर हा चित्रपट कथानक आधारित असून यात नवोदित जोडी वर्षा सोनार व अविनाश शिंदे, अश्विनी जाधवर पहिल्यांदाच प्रेेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. सोलापूर येथील प्रसिद्ध संमोहन तज्ञ रवींद्र सोरटे यांची कन्या सुप्रिया सोरटे यांनी या चित्रपटातील गीते आपल्या सुमधुर स्वरात गायली असून आजवर त्यांनी बऱ्याच मराठी हिंदी चित्रपटातील गीतांना आपला बहारदार आवाज देऊन प्रेक्षकाना मंत्रमुग्ध करून सोडले आहे. अश्विनी जाधवर या गुणी व अभिनय संपन्न व सुंदर भूमिका असलेला आणखी एक नवीन दर्जेदार चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
यावेळी प्रसिद्ध चित्रपट व नाट्य दिग्दर्शक सुनील नाईक, नूतन अध्यक्ष दिनकर पतंगे, लायनेस अध्यक्षा सुरेखा पतंगे, राजेंद्र आरळी,गितलेखक के.अजितकुमार, गिरीश कुलकर्णी, ज्येष्ठ पत्रकार,नजीरभाई चट्टरकी, यासिन जिगर आदी मान्यवर उपस्थित होते.





