जतचे मावळते तहसीलदार अभिजित पाटील यांचा कार्याचा जतला अच्छेदिन आणणारा आढावा
जत,प्रतिनिधी: साडेतीन वर्षात महसूल वसूली 17 कोटी,जलयुक्त शिवार योजनेतून 5126 जलसंधाराणाची कामे,पाणी फांऊडेशनच्या माध्यमातून 131 लाख घनमीटर कामातून जतला संमृध्द बनविणाऱ्या व
जत महसूल विभागात आमुग्राल बदल करून जतचा नावलौकिक मिळविण्यात तहसीलदार अभिजित पाटील यांचे यश जतला कायमस्वरूपी आदर्शवत राहणारे आहे.जतचे गेल्या साडेतीन वर्षाहून जास्त काळ तहसीलदार म्हणून काम केलेले तहसीलदार अभिजित पाटील यांचा कार्यकाळ येत्या दोन दिवसात संपणार आहे. माळशिरस येथे ते रुजू होत आहेत.
त्या पाश्वभूमीवर त्यांनी गेल्या साडेतीन वर्षात दुष्काळी जत तालुक्यात केलेल्या कार्याचा आढावा येणाऱ्या अधिकाऱ्यांना प्रेरणादायी ठरणार आहे.जतला रुजू होताना सुमारे 100 टँकर असणारा तालुक्यात साडेतीन वर्षे शासनाच्या निधीचा योग्य वापर करून व प्रंचड आत्मविश्वासाने कार्यकाळाच्या शेवटी टँकर मुक्त तालुका करण्याचे सर्वात मोठे श्रेय तहसीलदार पाटील यांचे आहे.जलयुक्त शिवार,पाणी,नाम फांऊडेशचा योग्य पध्दतीने अमलं करून त्यांनी तालुक्यात जलसंधाराचे काम कल्पनाविश्वाच्या पलिकडे केले आहे.अगदी स्व:ता हाता खोऱ्या,टिकाव घेऊन केलेले काम,जत तहसीलदार कार्यालयात केलेली हिरवाई तहसीलदार पाटील हे चांगल्या कामाची पुंजी घेऊन जाणारे आहे.तर दुसरीकडे चांगल्या पाऊसाने होणारा पाणी साठा जतला पाणी संमृध्द करणारा ठरणार आहे.
जतच़्या महसूल प्रशासनात त्यांनी बसविलेली घडी कधीही न विसरणारी आहे.तालुक्यातील 113 गावात 7 हाजारावर रेशनकार्ड,120 वादग्रस्त पांणद रस्ते त्यांनी खुले केले आहेत.तुतीलागवड,रेशीम उद्योग अशा योजनेतून 250 कामांना मंजूरी दिली,त्याशिवाय सध्या 116 कामे सुरू आहेत.बेकायदेशीर वाळू वाहतूक करणाऱ्या 354 वाहनावर कारवाई करून सुमारे सव्वा दोन कोटीचा दंडाच्या वसुलीसह इतर व पत्रातून 13 कोटी, 21 लाख,27 हाजार,35 रुपये इतका महसूल शासनाला जमा केला आहे.कार्यालयात झिरो पेंडशी सह दप्तर अद्यावत करत दैनदिनी निगर्मीत केल्यामुळे जत तहसील कार्यालया ISO:9001:2015 चे मानांकन मिळाले आहे.तहसीलदार पाटील यांच्या बदलीने जतला लाभलेल्या सर्वाधिंक कार्यशील अधिकाऱ्यांला तालुका मुकला आहे.
जतच्या दुष्काळी स्थितित मोठे काम करून केलेले काम माझ्या आयुष्यात महत्वपुर्ण राहणार आहे.जतच्या दुष्काळी, प्रेमळ जनता,कर्मचाऱ्यांची सहकार्य व कौतुकाची थाप टाकणाऱ्या राजकीय नेत्यांच्यामुळे इतके सक्षम काम मी करू शकलो,यापुढे जतच्या महसूली विभागात प्रांताधिकारी म्हणून येण्यास मला आंनद वाटेल.-अभिजित पाटील,तहसिलदार






