बालगाव | मटका व बेकायदा दारू अड्ड्यावर छापा,मुद्देमाल व तीन संशयित ताब्यात |

0
7

उमदी,वार्ताहर: बालगाव ता.जत येथे बेकायदा मटका व दारू अड्ड्यावर उमदी पोलिसांनी छापा टाकून रोख 2530 रु व मुद्देमाल जप्त केला.तीन सशिंयतांनाही ताब्यात घेतले आहे.वाढलेल्या अवैद्य धंद्याच्या पाश्वभूमीवर सा.पोलिस निरिक्षक भगवान शिंदे यांच्या पथकाने कारवाई केली.
याबाबत अधिक माहीती अशी की बालगांव गावी मटका व देशी दारुची विक्री होत असल्याची माहीती उमदी पोलिसांना मिळाली होती त्यानुसार सापळा  रचुन छापा टाकला असता मटका घेणारा राजू मदगोंडा केरूर (वय-31) याला ताब्यात घेत यांच्याकडे असलेले  2430 रुपये रोख रक्कम व चिठ्ठ्या, दोन पेन असे साहित्य जप्त केले. परापा बाळाप्पा चांभार (रा.बालगांव)हा त्याचे पानपट्टीच्या शेजारी देशी दारुची विक्री करत होता त्याचे कडील एकूण सातशे पन्नास रुपये किमतीचे देशी दारूचे साहित्य जप्त केले.मल्लपा विठ्ठल कांबळे याने त्याचे राहते घराशेजारी असलेल्या पडक्या घरात देशी दारू विक्री करण्याच्या उद्देशाने साठवणुक केलेली सातशे पन्नास रुपये किमतीचे दारु मिळून आली आहे.वरील सर्व संशयितांना ताब्याच घेण्यात आले आहे.बालगावमध्ये एकाच वेळी तीन ठिकाणी कारवाई झाल्याने चर्चेला अधान आले आहे. पो.ना. पलूसकर,पो.का.श्रीशैल वळसंग, पो.का.सगर सहभागी होते.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here