जत, प्रतिनिधी:जत पोलीसांनी मागील दहा वर्षातील सर्वात मोठे कोंबींग अॉपरेशन केले. स्फोटकांचा साठा, दरोड्यासाठीचे साहित्य, 6 चोरीच्या मोटारसायकली जप्त केल्या.सहा संशयितांना ताब्यात घेतले. 2 पोलिस निरिक्षक,5 सा.पोलिस निरिक्षक,2 दंगल नियत्रंण पथकासह सुमारे 150 पोलिसांनी कारवाईत सहभाग घेतला.
उमराणी रोड पारधी तांडा व शहरातील पारधी तांडा या दोन्ही ठिकाणी रविवारी पहाटे तीनच्या दरम्यान पोलीस निरिक्षक राजू ताशीलदार यांनी पोलीस अधिक्षक सुहेल शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई केली.अचानक झालेल्या या प्रकाराने पहाटे पारधीतांड्यात मोठी खळबळ माजली. पोलिस आल्याची कुणकुण लागल्याने काहीजण पसार झाले. तालुक्यात 10 वर्षानंतर एवढ्या मोठ्या प्रमाणात कोबिंग ऑपरेशन करण्यात आले.
सहा दुचाकी,6 जिलेटीन कांड्या, गँस कटर, गँस शेगडी, 3 कटावण्या,लोंखडी पाईप, वायर, लोंखडी पाने, 2 लोंखंडी प्लग पाने, 2 फ्रेम, एक्सा ब्लेड, फेशर बेल्ड, 8 कटरचे ब्लेड, नायलान दोरी, 2 रेग्यूलटर, 2 पाईप कटिंग करण्याचे गँस कटर मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.घरफोडी सारख्या गंभीर गुन्हातील संशियत शिवाजी पल्हाद चव्हाण वय-23, संतोष पल्हाद चव्हाण वय-22 यांच्यासह अन्य चार रेकार्डवरील गुन्हेगारांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.जिल्हाभर सुरू असलेल्या चोरीसत्राच्या पाश्वभूमीवर पोलिस अधिक्षक सुहैल शर्मा,अप्पर पोलीस अधिक्षक शंशिकात बोराटे यांच्या आदेशावरून पोलीस निरिक्षक राजू तहसिलदार, प्रकाश गायकवाड, सा.पोलीस निरिक्षक भगवान शिंदे, आप्पासाहेब कत्ते, सचिन गडवे, श्री.व्हसमळे सह 150 पोलिसांनी कारवाईत सहभाग घेतला. तालुक्यातील रेकार्डवरील गुन्हेगारांना पकडण्यासाठी ही मोहिम राबविण्यात आली. यात तांड्यावरील सर्व घरांची झडती घेण्यात आली.जिल्हाभर धुडघूस घालत असलेल्या दुचाकी चोरी, घरफोडीच्या मोठ्या घटना घडल्या आहेत. त्या अनुषंगाने रेकार्ड वरील गुन्हेगार असणाऱ्या तांड्यावरील घरे तपासण्यात आली. सहा संशियतांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून अनेक घरफोड्या, दुचाकी चोऱ्या उघडकीस येण्याची शक्यता आहे.
जत पोलीसांनी शहरातील उमराणी रोड पारधी तांडा व शहरातील पारधी तांडा अशा दोन ठिकाणी कोंबिग ऑपरशेन करून पकडलेल्या दुचाकी व घरफोड्यासाठी वापरले जाणारे स्फोटक साहित्य






