जत | दुष्काळी जनचेच्या आरोग्य सुदृढ बनविण्यास आरोग्य शिबीरांचा फायदा : संग्रामसिंह देशमुख |

0
5

जत,प्रतिनिधी: जत तालुक्यातील दुष्काळी जनतेच्या आरोग्य समस्या सोडविण्यासाठी आरोग़्य सुविद्या या शिबिरातून मिळाल्या आहेत. जिल्हा परिषदेचा आरोग्य विभागाकडून अशी शिबिरांचे आयोजन करून जनतेचे सुदृढ आरोग्य बनविण्यात येत आहे.शासनाच्या महात्मा जोतिबा फुले आरोग्य योजनेअंतर्गत रुग्णांना लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न आमचा राहिल असे प्रतिपादन जिल्हा परिषद अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांनी केले.जि.प.आरोग्य विभाग आयोजित ह्रदयरोग मोफत शिबिराच्या उद्घाटन प्रंसगी देशमुख बोलत होते.यावेळी आ.विलासराव जगताप,भाजप नेते डॉ.रविंद्र आरळी, जि.प.आरोग्य व शिक्षण समिती सभापती तम्मनगौडा रविपाटील,सेवासदनचे डॉ.रविकांत पाटील , जि.प.उपाध्यक्ष सुहास बाबर,पं.स.सभापती मंगल जमदाडे,जि.प.सदस्य सरदार पाटील,स्नेहलता जाधव,मंगल नामद व प्रभाकर जाधव,आप्पासाहेब नामद,गटविकास अधिकारी अर्चना वाघमळे,डॉ. डी.जी.पवार,निशादेवी वाघमोडे,चंद्रकांत गुड्डोडगी , डॉ .विद्याधर किट्टद,संतोष मोटे इत्यादी मान्यवर यउपस्थित होते.या शिबिरात 495 रुग्णांची तपासणी करण्यात आली आहे.
यावेळी बोलताना आ.जगताप म्हणाले,निरोगी आरोग्य ही एक माणसाची प्रमुख गरज आहे.या शिबीरामुळे गरीब नागरिकांना फायदा होणार आहे.तम्मनगौडा रविपाटील एक तरुण व विश्वासू कार्यकर्ते आहेत. त्यांनी सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले आहेत.अश शिबिराच्या आयोजन मुळे शासनाच्या मोफत आरोग्य योजना तळागाळातील जनतेपर्यत पोहचवणे शक्य झाले आहे.असे शेवटी आ.जगताप म्हणाले.
      कार्यक्रमाच्या सुरवातीस जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हर्षला वेदक यानी स्वागत व प्रास्ताविक केले.सभापती तम्मणगौडा रवीपाटील,सेवासदनचे डॉ.रविकांत पाटील , जि.प.उपाध्यक्ष सुहास बाबर यांनी मनोगते व्यक्त केली.

जत येथील मोफत ह्रदयरोग शिबाराचे उद्घाटन करताना जि.प.अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, आ.विलासराव जगताप,तम्मणगौडा रवीपाटील, अमोल बाबर आदी,शिबिराचा लाभ घेताना रुग्ण

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here