जत,प्रतिनिधी : शहरात गेल्या पंधरा दिवसापुर्वी झालेल्या संततधार पावसामुळे रस्त्यांची पुन्हा चाळण झाली आहे. यामध्ये प्रामुख्याने उपनगरांमधील रस्त्यांना प्रचंड खड्डे पडले असून, यामुळे नागरिकांची पूर्ण दैना उडाली आहे.संततधार पावसाने अनेक रस्त्यांवर खड्डे पडले असून, खड्ड्यांमुळे जागो-जागी पाण्याची डबकीच डबकी साचली आहेत. सिमेंट रस्त्यांवरील स्पीडब्रेकर व ड्रेनेजच्या झाकणालगत मोठ-मोठे खड्डे पडल्याने हे रस्तेदेखील प्रचंड धोकादायक झाले आहेत. पावसामुळे पडलेल्या खड्ड्यांमुळे शहरात अनेक ठिकाणी रस्ते धोकादायक झाले असून, अपघातांची शक्यता वाढली आहे.
रस्त्यांवर अत्यंत चुकीच्या पद्धतीने लावण्यात अलेली ड्रेनजची झाकणेदेखील धोकादायक झाली असून, यामुळे सध्या शहरातील सिमेंट रस्ते अपघाताचे सापळे बनले आहेत.त्याशिवाय शहरातून जाणाऱ्या विजापूर-गुहागर मार्गावर तर मरणकळा सोसून जा-ये करावी लागत आहे.यावर पंचायत समितीत वारवांर सदस्यांनी मागणी करून जै-थै स्थिती आहे.एकवेळ भरलेले खड्डे
पुन्हा पुर्वरत झाले आहेत.





