जत-सोरडी मार्गावर भिषण अपघात दुचाकीचा समोरासमोर धडक : तरूण अभिंयत्याचा मुत्यू : दांपत्य जखमी

0
12

जत,प्रतिनिधी : सोरडी- जत रोडवर संखतिर्थ पासून एक किलोमीटर अंतरावर दोन दुचाकीची समोरासमोर धडक होऊन तरूण अभिंयत्याचा मुत्यू झाला.गणेश व्यंकटेश जेऊर (वय-30,मुळ गाव-दरिबडची,सध्या रा.विद्यानगर जत)असे मयत अभिंयत्याचे नाव आहे.गुरूवारी दुपारी 2.30 ला अपघात झाला.

याबाबतची फिर्याद विनायक वाघमारे यांनी जत पोलिसात दिली आहे.

जत पोलिसाकडून मिळालेली अधिक माहिती अशी,अभिंयता गणेश जेऊर हे पुणे येथे खाजगी कंपनीत नोकरीस आहेत.ते मुळ दरिबडची येथील आहेत.त्यांचा 7 मे 2018 रोजी शेगाव येथील अभिंयता मुलीशी लग्न झाले आहे.पत्नी बेंगलोर येथे अभिंयता म्हणून खाजगी कंपनीत नोकरीस आहे.सध्या ते विद्यानगर येथे कुंटूबियांसह राहतात. गणेश यांची दरिबडची येथे वडिलार्जित शेती आहे.तेथे सध्या द्राक्षबाग लावली आहे.त्यांची देखरेख करण्यासाठी गणेश पुणे येथून दरिबडची येथे येतात.गुरूवारी गणेश जेऊर हे नित्याप्रमाणे(एमएच-10,एएल-6399) या दुचाकीवरून जतहून दरिबडची कडे चालले होते.त्यादरम्यान धर्मा मनोहर काळे(वय-35,रा.सोरडी) व त्यांची पत्नी(एमएच-12,बीएल-2136) दुचाकी वरून जतकडे येत होते.संखतिर्थ पासून एक किलोमीटर अंतरावरील वळसंग फॉरेटजवळ दोन्ही दुचाकीची समोरासमोर धडक झाली.त्यात गणेश जेऊर व काळे दांपत्य गंभीर जखमी झाले.गणेश यांच्या डोक्यास गंभीर दुखापत झाली होती.तिघांना जत येथे उपचार्थ आणत असताना गणेश यांचा वाटेत मुत्यू झाला.काळे दांपत्यावर मिरज येथे उपचार सुरू आहेत. गणेश जेऊर हे होतकरू तरूण होते.मोठ्या कष्ठाने ते अभिंयते झाले होते.पुणे येथे नोकरी करत ते शेतीही करत होते.तीन महिन्यापुर्वी त्यांच्या नात्यांतील शेगाव येथील अभिंयता मुलीशी त्यांचा विवाह झाला होता.दुर्देवाने त्यांच्या जाण्याने कुंटुबीयांवर मोठा आघात झाला आहे.याबाबत जत पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

Attachments area

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here