मेढिंगिरीतील बलात्कार प्रकरणी दोषी आरोपीला 10 वर्षे सक्तमजूरी,26 हजार दंड
जत,प्रतिनिधी : जत तालुक्यातील मेढिगिरीं येथे ताडपत्री मागण्याच्या बहाण्याने घरात घुसून बलात्कार करणाऱा अरोपी शिवानंद बसाप्पा संती रा.मेंढिगिरी ता.जत याला दोषी धरत 10 वर्षे सक्तमजूरी, 26 हजार दंड,दंड न भरल्यास 3 महिने कारावास अशी शिक्षा जिल्हा सत्र न्यायालयाने ठोठावली.
न्यायालयाने भा. द. वि. स. कलम 376(1) अन्वये दोषी धरत 7 वर्षे सक्तमजूरी व 10 हजार दंड व दंड न भरल्यास 3 महिने साधा कारावास,भा.द.वि.स.कलम 452 अन्वेय दोषी धरत 3 वर्षे सक्तमजूरी व 6 हजार दंड,दंड न भरल्यास एक महिना साधा कारावास, भा.द.वि.स.कलम 506 अन्वेय दोषी धरून 10 हजार दंड व दंड न भरल्यास एक महिना कारावास अशी शिक्षा सुनावली आहे.
दि. 23/10/2016 रोजी घडली होती. यातिल पिडित महिला तीचे पती,सासू-सासरे, दिर यांच्यासह राहते. पिडित मुलीचे घटनेआधी 8 महिन्यापुर्वी लग्न झाले होते. 23 ऑक्टोबंर 2016 ला सकाळी 9 वाजता आरोपी शिंवानंद संती हा पिडित महिला घरात एकटीच असल्याचा फायदा घेत ताडपत्री मागण्याच्या बहाणा केला. त्यावेळी पिडित महिला घरामध्ये ताडपत्री आणण्यासाठी गेली असता अरोपीने तिच्या पाठीमागे जात तिला मिठी मारली. पिडीतेने सुटका करून घेण्याचा प्रयत्न केला, मात्र आरोपीने तिला खाली पाडून तिचेवर बलात्कार केला. ही घटना कोणास सांगितलीस तर बघ म्हणून धमकी दिली. पिडितीने पतीला फोनवरून ही माहिती दिली. पती व पिडितीने आरोपीविरोधात फिर्याद दाखल केली होती.गुन्ह्याचा तपास तत्कालीन पोलिस निरिक्षक युवराज मोहिते यांनी केला. तातडीने घटनास्थंळी पोहचत पंचासमक्ष पंचनामा केला. पिडित व आरोपीची कपडे जप्त करत आरोपीला पकडले.
पिडित महिलेची व आरोपीची वैद्यकीय तपासणी करून भक्कम पुरावे गोळा करून न्यायालयात दोषारोपत्र दाखल केले. सत्र न्यायाधिश क्र.5 दत्तात्रय सातवळेकर यांच्या न्यायालयात सुनावणी झाली. सरकार पक्षातर्फे 6 साक्षीदार तपासण्यात आले. यातिल पिडित महिला, वैद्यकीय अधिकारी, व इतर साक्षीदारांचे जबाब व वैद्यकीय अहवाल यावरून आरोपी शिवानंद बसाप्पा संती वय 25 या शिक्षा सुनावली.यात सरकार पक्षातर्फे अति. सरकारी अभियोक्ता सौ.आरती साटविलकर-देंशपाडे यांनी काम पाहिले.





