बोर्गी | गाज्या शेतीवर छापा,95 हाजाराची गांज्याची झाडे जप्त,संशियत ताब्यात |

0
22

जत,प्रतिनिधी: बोर्गी ता.जत येथील बालगावकडे जाणाऱ्या जुना रस्त्यालगत शरणाप्पा संगप्पा व्होनमोरे (वय-60) यांच्या ऊसाच्या शेतात बेकायदा लावलेल्या गांज्या शेतीवर उमदी पोलिसांनी छापा टाकला.त्यात 8 फुच उंचीची 17 किलो वजनाचे 7 झाडे जप्त करण्यात आली आहेत. त्यांची 95 हाजार इतकी किंमत होते.
पुर्व भागातील वाढत्या गांज्या शेतीला पायबंध घालण्यासाठी उमदी पोलिसाचे प्रयत्न सुरू आहेत. त्याअनुषांने अनेक गावात गुप्त खबऱ्याद्वारे अवैद्य धंद्याची माहिती मिळवून कारवाई केली जात आहे. बोर्गी-बालगाव रस्त्याकडेला असणाऱ्या शरणाप्पा व्होनमोरे यांने ऊसाच्या शेतात गांज्या लावल्याची खबर खबऱ्यामार्फत उमदी पोलिसांना मिळाली होती.त्या आधारे हा छापा टाकण्यात आला. मुद्देमाल जप्त करून संशियत शरणाप्पा व्होनमोरे याला ताब्यात घेण्यात आले आहे.सा.पोलिस निरिक्षक भगवान सांळुखे,पो.हे.कॉ.कोळी,कोष्ठी,पलूसकर,
हांडे,यांनी या कारवाई भाग घेतला.अधिक तपास भगवान साळुंखे करत आहेत.

बोर्गी ता.जत येथे गांज्या शेतीवर छापा टाकून मुद्देमालासह संशियतांला पोलिसांनी ताब्यात घेतले.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here