माडग्याळ | बसस्थानक सापडेल का? ओ,हरविलेले रस्ते,बसस्थानक,पिण्याचे पाणी व सामान्य सुविधेसाठी नागरिकांचा ठाहो

0
4

माडग्याळ,वार्ताहर: अधिच मोडकळीस आलेले माडग्याळचे एसटी बसस्थानक अतिक्रमणामुळे हरवले आहे.व्यावसायिकांचे अतिक्रमने व वाहनाच्या गर्दीमुळे येथे पिक-अप शेड होते काय?असे म्हणायची वेळ आली आहे.त्यामुळे प्रवाशांना रस्त्यावर उभे रहावे लागत आहे. ते महिला प्रवाशी,शालेय विद्यार्थीनीना अडचणीचे ठरत आहे.पंचवीस गावाची प्रसिध्द बाजार पेठ असणाऱ्या माडग्याळ येथे तातडीने सुसज्ज बसस्थानक बांधावे अशी मागणी होत आहे.

ग्रामीण रुग्णालय,माडग्याळी शेळीचे मुख्य बाजार पेठ व भविष्यात तालुका निर्मितीमध्ये चर्चा असणाऱ्या माडग्याळचे बसस्थानक, मुख्य राज्य महामार्ग अतिक्रमणामुळे हरवला आहे. गाव चालू झाल्यापासून संपेपर्यत एकेरी वाहतून होते.हा आंतरराज्यीय महामार्ग आहे.हे विशेष..माडग्याळी शेळी शेळी-मेढीचा बाजार म्हणून देशभर माडग्याळचा बाजार प्रसिध्द आहे.या शेळी-मेढी खरेदीसाठी मुंबई, पुणे,कोल्हापूर,सोलापुर, हैंदाबाद,विजापूर, बेंळगाव,सातारा,आंध्रप्रदेश राज्यातील व्यापारी येथे येतात.त्यांना प्राथमिक सुविद्या तर सोडाच येथील अतिक्रमणामुळे साधे चालतही जाता येत नाही.त्याशिवाय जतचे विभाजन नंतर माडग्याळ तालुका होण्याची ही शक्यता आहे.तसे प्रस्ताव शासनाकडे दाखल आहेत.त्या अनुषंगाने येथे प्रशस्त ग्रामीण रुग्णालयही उभारण्यात आले आहे.जत-चडचडण या राज्य महामार्गा वर वसलेल्या या गावांचा गेल्या अनेक वर्षापासून विकास ठप्प आहे.प्रत्येक पाच वर्षानंतर येणारे सत्ताधारी निवडणूकी पुर्व मोठ्या गर्जना करून आश्वासने देतात.पुढे पाच वर्ष यथोचिस्त सत्ता कारभार चालवितात.पुन्हा तीच आश्वासने देऊन नविन सत्ताधारी स्थापन्न होतात.प्रश्न मात्र देश स्वंतत्र झाल्यापासून जैसे-थेच आहेत.ग्रामस्थांना प्राथमिक सुविद्या पुरविण्यातही ग्रामपंचायत कमी पडत असल्याचे आरोप होत आहेत.साधे पिण्याचे पाणीही येथे विकत घ्यावे लागते.त्यामुळे खरेच सत्ताधिशांना जनतेची काळजी आहे का?हा संशोधनचा विषय आहे.सध्यातरी अतिक्रमनांच्या गर्देत सापडलेल्या एसटी पिक-अप शेड व रस्ता खुला करून गावाचा नावलौकिक मिळविण्यासाठी प्रयत्न व्हावा अशा माफक अपेक्षा ग्रामस्थांनी संकेत टाइम्स कडे व्यक्त केली.

चौकट

माडग्याळचा भविष्यातील विस्तार व परिसरीतील गावातील ये-जा करणाऱ्या प्रवाशांच्या हिशोबाने प्रशस्त बसस्थानक उभारणे गरजेचे आहे. आता उभे कालबाह्य एसटी पिक-अप शेड कधी कोसळेल यांचा नेम नाही.त्याशिवाय काहीजणां कडून बाह्य खोचून शेडची जागा बळकांवण्याचाही मोठा धोका नाकारता येत नसल्याचे काही सुज्ञ नागरिकांनी सांगितले.

माडग्याळ ता.जत येथे अतिक्रमणांच्या गर्देत हरविलेले बसस्थानक (छायाचित्र; रमेश चौगुले)

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here