दरवाज्याचे व तिजोरीचे कुलूप तोडून सोन्या-चांदीचे दागिण्यावर डल्ला
जत,प्रतिनिधी:जत शहरातील मध्यवर्ती मंगळवार बाजारपेठेतील श्रीविजय ज्वेलर्स दुकाना अज्ञात चोरट्यानीं 465 ग्रॅम सोने,27 किलो चांदीचे दागिणे असा 24 लाख 48 हाजार रूपयाचा मुद्देमाल लंपास केला. घटना रविवारी मध्यरात्री घडली.दुकानातील सर्व सोने-चांदीच्या दागिण्याची लुट झाल्याने सराफ सुनिल कदम यांचे कुटुंबिय उघड्यावर आले आहे.
याबाबत जत पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यत सुरू होते.शहरातील आतापर्यतची सर्वात मोठी चोरी आहे.काही गावात पकडलेल्या चोरट्या मुळे चोऱ्यांचे सत्र थांबले होते.मात्र पुन्हा रविवारी झालेल्या धाडसी चोरीने व्यापारी वर्गात घबराट पसरली आहे.
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी,जत येथील मंगळवार पेठ,जत नगरपरिषदेच्या शेजारी कापड पेठेत सुनील महादेव कदम यांच्या मालकीचे श्रीविजय ज्वेलर्स हे ज्वेलर्सचे दुकान आहे.ते अनेक वर्षापासून सराफ व्यवसाय करतात.कदम यांनी नागपंचमीचा सण असल्याने सोन्या-चांदीचे दागिण्याची मोठ्या प्रमाणात खरेदी केली आहे. रविवारी रात्री दुकान बंद करून ते रामराव नगर येथील घरी गेले होते.सोमवारी सकाळी सहाच्या दरम्यान मॉर्निग वॉकला निघालेल्या काही नागरिकांच्या कदम यांच्या दुकानात चोरी झाल्याते लक्षात आल्याने त्यांनी कदम यांना चोरी झाल्याची माहिती फोनद्वारे दिली.सराफ
दुकानाला बाहेरून लाकडी दरवाजा तर आतून सरकता लोखंडी ग्रीलचा दरवाजा आहे. या दुकानाला लाकडी व लोखंडी दरवाजाला कूलूप लावले होते. दरम्यान रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यानी दुकानातील प्रथम लाकडी व लोखंडी दरवाजाच्या कड्या तोडून दुकानात प्रवेश केला. दुकानातील लोखंडी तिजोरी तोडून त्यातील ठेवलेले सोने 465 तोळे व चांदी 27 किलो असा एकूण 24 लाख 48 हजारांचा माल अज्ञात चोरट्यानी लंपास केला. कदम यांनी जत पोलीस ठाण्यात चोरीच्या घटनेची माहिती दिली. यावेळी पोलीस निरीक्षक राजू ताशिलदार यांनी घटनास्थळी तात्काळ भेट दिली. दरम्यान सांगली पोलीस दलातील बिल्लू श्वानास पाचारण करण्यात आले.या श्वानाने दुकानापासून लोखंडी पूलाच्या बाजूच्या रस्त्यापर्यंतचा माग काढला. लोंखडी पुलाजवळ चार चाकीच्या वाहनाच्या चाकाच्या ठशाजवळ श्वान घुटमळले.चोरट्यानीं चारचाकी वाहनांचा वापर केला आहे.अनेकजणांचा चोरीत समावेश असल्याचा पोलिसाचा अंदाज आहे. जत शहरातील मध्यवर्ती बाजार पेठेतील यापुर्वी अनेक दुकानात चोऱ्या झाल्या आहेत. त्यापैंकी ही सर्वात मोठी धाडसी चोरी आहे.कदम यांच्या दुकानातील जवळपास सर्वच दागिण्यावर चोरट्यानीं डल्ला मारला आहे.त्यांनी गुंतवणूक केलेले सर्वच भांडवल गेल्याने त्यांच्या व्यवसाय उद्ववस्त झाला असल्याची प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.दरम्यान या घटनेची फिर्याद सुनील कदम यांनी दिली असून अधिक तपास पोलीस निरीक्षक राजू ताशिलदार करीत आहेत.
जत येथे चोरी झालेले श्रीविजय ज्वेलर्स दुकान





