संख,वार्ताहर:संख अप्पर तहसिल कार्यालय येथे धनगर समाजाचा अनूसूचित जमातीत समावेश करून समाजाला अनूसूचित जमातीच्या सवलती लागु कराव्यात या प्रमुख मागणीसाठी संख परिसरातील धनगर समाज बाधवानी संख येथे अप्पर तहसिल कार्यालयावर सोमवारी मोर्चा काढत धनगर समाजाने पुकारलेल्या ‘महाराष्ट्र बंदला पांठिबा दिला.यावेळी संख गावातून मोटर सायकल रॅलीही काढण्यात आली. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आण्णासाहेब गडदे यांच्या नेतृत्वाखालील हा मोर्चा काढण्यात आला.धनगर समाजाचे अनूसूचित जमातीत समावेश करून अनुसूचित जमातीच्या सर्व सवलती लागु करराव्यात ,सोलापूर विद्यापिठास अहिल्यादेवी होळकर यांचे नाव द्यावे.धनगर समाजा बांधवाना शेळ्या- मेढ्या चारण्यासाठी राखीव कुरणे उपलब्धं करून द्यावेत या मागण्याचे निवेदन अप्पर तहसिलदार नागेश गायकवाड यांना देण्यात आले.प्रथमतःरॅलीने आलेल्या समाजबांधवानी संखच्या बसवेश्वर चौकातून अप्पर तहसिल कार्यालया पर्यत जय अहिल्या,जय मल्हार,तसेच धनगर समाजाला आरक्षण जमातीचे.आरक्षण मिळालेच पाहीजे या घोषणांनी परिसर दणाणीन सोडला.अप्पर तहसिल कार्यालया पर्यत आलेल्या मोर्चाचे नंतर सभेत रूपांतर झाले.यावेळी हिंदुराव शेंडगे,आण्णासाहेब गडदे,जालेलिदर करवे,नागनाथ मोटे यांची भाषणे झाली. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये अनूसुची 36 नंबरवर आरक्षण धनगर समाजाला दिलेले आहे.पंरतू राज्यघटनेमध्ये धनगर समाजाला महाराष्ट्रात मराठीत धनगर व हिंदी मध्ये धनगड असा उच्चार होतो.तरीसुद्धा आदिवाशी समाजाचे मंत्री यांनी कपटबुद्धीने आमच्या हक्क हिरावून घेण्यासाठी कोर्टामध्ये धनगर व धनगड या दोन्ही जाती एकच असल्याचे खोटे प्रतिज्ञापञ दाखल करत आमच्या समाजाच्यावर अन्याय केला आहे.दसरथ गोफणे,सदाशिव कोळेकर,जालींदर व्हनमाने,लहु लोंखडे,श्रवण लोखंडे,हिदुराव शेडंगे,विलास देवकते,गुलाब मोटे,नेताजी टेंगले,अशोक गडदे उपस्थित होते.माजी जि.प.अध्यक्ष अाण्णासाहेब गडदे यांनी स्वागत, नागनाथ मोटे यांनी प्रस्ताविक तर आभार दसरथ गोफणे यांनी मानले.
संख :धनगर आरक्षण मागणीसाठी संख अप्पर तहसील कार्यालयावर मोर्चा काढत मागण्याचे निवेदन देण्यात आले.






