संख | बेकायदा वाळू तस्करी करणारी चार वाहने पकडली : 11 लाख दंड |

0
6

संख, वार्ताहर : संख ता.जत येथील ओढापात्रात बेकायदा वाळू तस्करी करणारे दोन डम्पर व 2 टॅक्टर जप्त करत 11 लाख रुपयाचे दंडाची कारवाई वाळू तस्करी विरोधी पथकाने मोठी कारवाई केली.
संख लगतच्या बोर नदी पात्रातून होणाऱ्या तस्करीला रोकण्यासाठी प्रशासन कसोसरीने प्रयत्न करत आहे.त्या पाश्वभूमीवर गुरूवारी ही कारवाई करण्यात आली.
संख नदीपात्रात हे डम्पर व ट्रँक्टर वाळू तस्करी करत होते.गुरूवारी दुपारी एक वाजता ही वाळू तस्करी निदर्शनास आल्यानंतर छापा टाकण्यात आला.चारी वाहने उमदी पोलिसाच्या ताब्यात दिली आहेत. प्रांताधिकारी तुषार ठोंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार नागेश गायकवाड, मंडल अधिकारी तुकाराम तळपे,तलाठी राहूल कोळी,अनिल हिप्परकर, हणमंत बामणे,गणेश पवार,सुभाष थोरात,कोतवाल, पोलिस पाटलांनी ही कारवाई केली.

वाळू तस्करी करणारे जप्त केलेली वाहने

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here