बसर्गीत गटारीची स्वच्छता सुरू

0
5

गुगवाड,वार्ताहर : बसर्गी (ता.जत) येथील ग्रामपंचायतीचा नुकताच पदभार घेतलेले ग्रामसेवक बी.बी खरमाटे यांनी पदभार स्वीकारताच गतीने कामकाज सुरू केले आहे.गावात अनेक दिवसापासून डेंगू,चिकनगुनिया आजाराने रुग्ण सापडत आहेत.त्यामुळे उपसरपंचानी स्व:खर्चातून औषध फवारणी केली होती.त्यामुळे ग्रामपंचायत करते काय असा प्रश्न नागरिंकातून उपस्थित होत होता.त्या अनुषंगाने गावातील अनेक दिवसापासून तुंबलेले गटारीचीं स्वच्छता मोहीम हाती घेतली आहे.साथीच्या आजाराच्या पाश्वभूमीवर हे कौतुकास्पद काम आहे. त्याशिवाय अन्य विकास कामात त्यांनी सतर्कता दाखविली आहे.वसूली,जुने विषय,विकासकामे पुर्ण करण्यासाठी पदाधिकाऱ्यांशी समन्वय साधून बसर्गीचा नावलौकिक मिळवू असे यावे बोलताना खरमाटे म्हणाले, त्यांच्या या कतृत्वदक्ष पणाबद्दल बसरगी ग्रामस्थांच्या वतीने अभिनंदन होत आहे.तसेच गावातील सर्व प्रलंबित कामे पूर्ण व्हावीत अशी अशा व्यक्त करण्यात आली. 

बसर्गी ता.जत येथे गटारीचा स्वच्छता करण्यात आली.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here