
माडग्याळ,वार्ताहर:माडग्याळ(ता.जत) येथे सकल मराठा समाजाच्या वतीने पुकारलेल्या ‘महाराष्ट्र बंदला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला.गावातून मराठा समाज बांधवानी रँली काढली.संपुर्ण गावातील दुकाने,पानटपऱ्या,शाळा बंद ठेवण्यात आल्या होत्या.माडग्याळ ते संख अप्पर तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. सकाळी 8 ते सायकांळी 5 वाजेपर्यत कडकडीत बंद पाळण्यात आला. परिसरातील सनमडी, आंसगी, सोन्याळ, जाड्डरबोबलाद, उटगी मध्ये बंद ठेवण्यात आला.तहसीलदार नागेश गायकवाड यांना निवेदन देण्यात आले.