जत | पानी फांऊडेशन मधून जलसंधारणाबरोबरचं मनसंधारणाचे काम झाले : आ.विलासराव जगताप |

0
6

जत,प्रतिनिधी : “पानी फाउंडेशनच्या माध्यमातून जत तालुक्यात जल चळवळ उभी राहिली आहे. या उपक्रमामुळे तालुक्यातील दुष्काळी गावात  जलसंधारणाबरोबरचं मनसंधारणाचे काम मोठ्या प्रमाणात झाले आहे. पुढील वर्षीचे नियोजन यावर्षी केले तर अजून चांगले काम पुढे होईल. यासाठी यापुढेही गावागावातील लोकांनी संघटीत होवून चांगली कामे करुन राज्यपातळीवर बक्षिस मिळवण्यासाठी प्रयत्न करावा.” असे आवाहन आ.विलासराव जगताप यांनी केले.
जत येथील तलाठी भवन सभागृहात  ‘पानी फाउंडेशन’च्या वतीने “गौरव जलरत्नांचा” हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात आ.जगताप बोलत होते.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य सरदार पाटील, प्रांताधिकारी तुषार ठोंबरे, तहसिलदार अभिजित पाटील, उपविभागीय कृषी अधिकारी कांताप्पा खोत, पानी फाऊंडेशनचे जिल्हा समन्वयक तालुका समन्वयक तुकाराम पाटील, हिना मुजावर आदींसह विविध गावांतील सरपंच, उपसरपंच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आ.जगताप पुढे म्हणाले,  यंदा तालुक्यात पानी फाउंडेशनच्या माध्यमातून मृद व जलसंधारणाची तालुक्यात मोठ्या प्रमाणात कामे झाली आहेत. मात्र अद्याप दमदार पाऊस झालेला नाही. येत्या काही दिवसात पाऊस निश्चित पडेल, अशी अपेक्षा आहे. येत्या काळात निवडणूका येतील आणि जातील, याचा परिणाम जलसंधारण आणि मनसंधारणाच्या कामात होवू देवू नका. यापुढे असाच एकोपा कायम ठेवून जलसंधारणाच्या कामाची गती वाढवा. ”
प्रांताधिकारी तुषार ठोंबरे म्हणाले, ” तालुक्यातील 106 गावात मृद व जलसंधारणाची कामे भारतीय जैन संघटनेने मोठी मदत केली. पानी फाउंडेशन वॉटर कप स्पर्धेत सुरवातीला 106 गावांनी  नाव नोंदणी केली  होती. मात्र प्रत्यक्षात 50 वर गावानीचं सहभाग घेतला. जत तालुक्यात मोठ्या प्रमाणात मृद व जलसंधारणाचे काम मशिन मनुष्यबळाने श्रमदानातून
काम झाले आहे.
पानी फाउंडेशनमुळे अनेक ठिकाणी भांडणे मिटून लोक एकत्र आली आहेत. तालुक्यातील एकातरी गावाला राज्यपातळीवरील बक्षिस मिळेल, अशी अपेक्षा आहे. पानी फाउंडेशनचे काम आजही न थांबवता गावानी आपली लढाई सुरु ठेवावी. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी पाण्याचे टॅंकर मागणी घटली आहे. जवळपास ट्रकर मुक्तीच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. गावानी पिण्याच्या पाण्यासाठी टॅंकर मागणे, ही चांगली बाब नाही.त्यामुळे येत्या काळात देखील जलयुक्त शिवार अभियानमध्येही गावानी चांगली कामे केली पाहिजेत. कोणत्याही गावाने सरकारच्या निधीवर बसू नये. यापुढे दुष्काळमुक्तीसाठी एकोप्याने कामे करावीत.  म्हणजे खऱ्या अर्थाने भविष्यात टंचाईग्रस्त गावे पाणीदार होण्यास मदत होईल. ” 
या कार्यक्रमाच्या सुरवातीला अभिनेते अमीर खान यांची स्क्रिनवर प्रतिक्रिया दाखवण्यात आली. यावेळी गटविकास अधिकारी तसेच निवडक शेतकरी, ग्रामसेवक व कार्यकर्त्यानी मनोगत व्यक्त केली. कार्यक्रमात 106 गावातील गावकऱ्यांचा  मान्यवरांच्या हस्ते सन्मान पत्र देवून सन्मान करण्यात आला. तसेच पानी फाउंडेशनमध्ये उल्लेखनीय काम करणाऱ्या ग्रामसेवक, जलमित्र, पत्रकार,  अधिकारी, पदाधिकारी व पानी फाउंडेशनचे तालुका टिम व प्रशिक्षक यांचाही सन्मान पत्र देवून गुण गौरव करण्यात आला. 

जत येथे ‘पानी फाउंडेशन’च्या वतीने “गौरव जलरत्नांचा”उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.

Attachments area

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here