जत | मुख्याधिकारी मागणीसाठी जत पालिकेच्या पदाधिकाऱ्यांचे 15 ऑगष्टला उपोषण |

0
8

जत,प्रतिनिधी: जत नगरपालिकेला गेल्या सहा महिन्यापासून कायमस्वरूपी मुख्याधिकारी नाही.त्यामुळे दैंनदिन कामाबरोबर विकास कामावर मोठा परिणाम झाला आहे. त्यामुळे तातडीने मुख्याधिकारी नेमावा अन्यथा 15 ऑगष्टला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर नगरपरीषदेचे नगराध्यक्ष,सर्व सभापती व नगरसेवक उपोषणास बसणार आहे. त्याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी यांना दिले आहे.
निवेदनात पुढे म्हटले आहे की,जत नगरपरिषदेला गेल्या सहा महिन्यापासून प्रभारी मुख्याधिकारी कडे कार्यभार आहे.ते नगरपरीषदेला पुर्ण वेळ देऊ शकत नाहीत. त्यामुळे विकास कामाबरोबर नागरिकांचे अनेक प्रश्न सुटत नाहीत. त्यामुळे प्रंचड असंतोष व्यक्त होत आहे.दैंनदिन कामाबरोबर, विकासकामे,नविन योजना,थकीत वसूली,पाणीपुरवठासह अन्य शासकीय कामे थांबली आहेत.मुख्याधिकारी नसल्याने शहराची दयनीय आवस्था झाली आहे. त्यामुळे पुर्ण वेळ मुख्याधिकारी द्यावा,अन्यथा 15 ऑगष्ट रोजी सकाळी 11 वाजता आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास बसणार आहोत.यावेळी नगराध्यक्ष शुंभागी बन्नेनवर,उपनगराध्यक्ष आप्पा पवार,भुपेंद्र कांबळे, निलेश बामणे,सायबा कोळी आदी उपस्थित होते.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here