26 जुलैला घडली होती घटना
जत,प्रतिनिधी: कोसारी ता.जत येथील एकाअल्पवयीन शाळकरी मुलीवर अतिप्रसंग करणारा संशियत आरोपी बाबासाहेब मधू करांडे वय-23 यास निर्भया पथकाने तिप्पेहळ्ळी (ता.मंगळवेढा) येथे पाठलाग करून पकडले.त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याचे तपास अधिकारी सा.पोलिस निरिक्षक वर्षा डोंगरे यांनी सांगितले. याबाबत जत पोलिसात 25 जुलैला पोक्सोअंतर्गंत गुन्हा दाखल झाला आहे.
अधिक माहिती अशी,कोसारी गावातील शाळेत शिकणारी अल्पवयीन मुलगी चालत घरी चालली असताना सशयिंत बाबासाहेब करांडे यांने घरी सोडतो म्हणून त्यांच्या दुचाकीवर बसविले. काही अंतरावरील कासलिंगवाडी येथील तलावानजिक निर्जन ठिकाणी मुलीशी अश्लील चाळे केले. तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. पिडित मुलीने आरडाओरडा केल्याने बाजूच्या शेतात शेळ्या राखणाऱ्या अमोल सांगोलकर याला हा प्रकार लक्षात आला. त्याने तिकडे धाव घेतली असता सशयिंत करांडे मुलीस विवस्त्र करून अतिप्रंसग करण्याचा प्रयत्न करत असल्याचे लक्षात आले. अमोल याने त्याला हुसकावून लावले व पिडित अल्पवयीन मुलीस वाचविले होते. त्यामुळे मोठा अनर्थ होता होता एका तरूणांच्या प्रंसगावधानामुळे थांबला.त्या कामगिरीबद्दल डिवायएसपी अजयसिंह निंबाळकर यांच्या हस्ते अमोलचा सत्कार केला होता.
दरम्यान घटना घडल्या दिवसापासून सशयिंत करांडे फरार होता. त्यांच्या शोधासाठी निर्भया पथकाकडून छापामारी सुरू होती. सोमवारी तो मंगळवेढा तालुक्यातील तिप्पेहळ्ळी येथे नातेवाईकांकडे असल्याची खबर पथकाला लागली होती. त्या माहितीच्या आधारे पथकाने तिप्पेहळ्ळी येथे छापा टाकला असता सशयिंत बाबासाहेब पळून ऊसाच्या शेतात लपला. पथकाने पाठलाग करून त्यांला जेरबंद करत जत पोलिस ठाण्यात आणला.
पोलिस निरिक्षक राजू तहसिलदार यांच्या मार्गदर्शनाखाली निर्भया पथकाच्या प्रमुख सहा.पोलिस निरिक्षक वर्षा डोंगरे, कर्मचारी गोपाल राठोड, अभिजित यमगर,गोविंद चव्हाण, सुप्रिया पाटील यांच्या पथकाने कारवाई केली.





