जत,प्रतिनिधी: जत तालुक्यातील बनाळी जिल्हा परिषद गटातील सनमडी,कुणीकोणूर, येळवी,बनाळी,रेवनाळ या पाच गावासाठी राष्ट्रीय पेयजल पाणी योजना मंजूर झाली असल्याची माहिती भाजप नेते सुनिल पवार यांनी दिली..या आमदार विलासराव जगताप, जिल्हा परिषद सदस्य सुनिता पवार यांनी प्रयत्न केले होते.
या गावात दरवर्षी पिण्याची पाणी टंचाई असते.म्हैशाळ योजनेतून गावालगतच्या काही तलावात पाणी सोडण्यात येते.मात्र तेथून पाणी उचण्यासाठी सोय नव्हती.या योजना या तलावाच्या उध्दव ठिकाणाहून अाहेत.त्यामुळे नागरिकांना मुबलक,व स्वच्छ पाणी उपलब्धं होणार आहे. या योजनेचा आराखडा मंजूर करून शासनास पाठविण्यात आला होता. त्यास मंजूरी मिळाली आहे.भविष्यात या गावातील पाणी टंचाई संपणार आहे.भाजपा नेते सुनिल पवार,सुनिता पवार यांच्या विकासाच्या प्रयत्नाला यामुळे यश आले आहे.लोकहितासाठी काम करणाऱ्या पवार यांच्या विषयी नागरिकांतून कृतृज्ञता व्यक्त होत आहे.





