जत,प्रतिनिधी : मराठा क्रांती ठोक मोर्चा जत तालुका यांच्या वतीने मराठा समाजाला आरक्षण मिळावे या व विविध मागण्यांसाठी दि. 1 ऑगस्ट पासून जत येथील तहसील कार्यालयसमोर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.आज अंदोलनाचा पाचवा दिवस आहे.जत बार असोशियन,जेष्ठ नागरिंक संघटना,संभाजी ब्रिगेड,मुस्लिम समाज संघटनेनी या अंदोलनाला पांठिबा दिला. आंदोलनाच्या चवथ्या दिवशी तालुक्यातील तिप्पेहळळी येथील मराठा समाज बांधवांनी या ठिय्या आंदोलनात सहभाग घेतला. तिप्पेहळळीचे सरपंच रविंद्र शिंदे,मारूती शिंदे,खलाटीचे उपसरपंच शहाजीबापू जाधव,वैभव सुर्यवंशी,राहुल शिंदे,पांडुरंग चव्हाण,डाॅ. महेश भोसले, अॅड. प्रभाकरभाऊ जाधव. डाॅ. संतोष शिंदे,डाॅ. अभिजीत पवार,डाॅ. आण्णासाहेब कोडग- पाटील,सुधीर चव्हाण, कुमार इंगळे,मुस्लिम समाज संघटनेचे नेते बंटी नदाफ, शफीकभाई इनामदार .सोहम करिअर अकॅडेमीचे पांडुरंग सावंत, उमराणीचे अमरसिंह डफळे, उत्तम चव्हाण,अमर जाधव, अरूण शिंदे, गणेश सावंत, मोहन मानेपाटील,प्रदिप नागणे, गणपतराव कोडग, प्रविण यादव,आदी सहभागी झाले होते.
जत : मराठा आरक्षण मागणीसाठी ठिय्या अंदोलनास जत बार असोशियनच्या वतीने पांठिब्याचे पत्र देताना संघचनेचे पदाधिकारी





