जत | भाजप विजयाचा जतेत जल्लोष विकासात्मक,व लोकहिताच्या कामाची पोचपावती : डॉ.रविंद्र आरळी |

0
5

जत,प्रतिनिधी: सांगली-मिरज-कुपवाड महापालिकेत भाजपने निर्विवाद यश मिळविल्याबद्दल जत भाजपाच्या वतीने फटाके फोडण्यात आले. साखर, पेढे वाटून आंनदोत्सव साजरा केला.भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष डॉ.रविंद्र आरळी यांच्या अध्यक्षतेखाली गांधी चौकात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
भाजप शासित केंद्र,राज्य शासनाच्या लोकहिताची कामे करत,सामान्य जनतेच्या योजना व विकासात्मक कामाची पोचपावती सांगली व जळगाव महापालिकेतील विजयाने मतदारांनी दिली आहे,असे यावेळी बोलताना डॉ.रविंद्र आरळी म्हणाले,तालुकाध्यक्ष चंद्रकात गुड्डोडगी,भाजपचे सर्व नगरसेवक, पदाधिकारी, कार्यक्रर्ते उपस्थित होते.

भाजप विजयाचा जतेत जल्लोष करण्यात आला.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here