येळवी,वार्ताहर:येळवी ता.जत येथे भिषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. त्यापार्श्वभुमीवर काय उपाययोजना करायच्या यासाठी तातडीची विशेष ग्रामसभा संपन्न झाली.या सभेत पाणी टंचाईवर खल झाला.उपस्थित नागरिकांनी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली.संरपच अविनाश पोरे व उपसंरपच सुनिल अंकलगी यांनीही पाणी टंचाई दुर करावी यासाठी आम्ही गतीने प्रयत्न करत असल्याचे सांगितले.यापुर्वी नागरिकांची पाणी टंचाईतून मुक्ती करण्यासाठी योजनेचा पाणी स्ञोत असणाऱ्या तलावात नव्याने मोटार टाकण्यात आली होती.त्याला विज जोडणीही करण्यात आली होती. त्याद्वारे तलावातील पाणी विहिरीच्या बाजूने सोडून ते जमिनीत मुरवत पुर्नभरण करून विहिरीचे पाण्याचे झरे वाढण्याचे नियोजन झाले होते.मोटार,विद्युत जोडणीची जत पंचायत समितीचे अभिंयते श्री.मठपती व श्री. गावित यांनी पाहणी करून पाणी पुरवठा सुरू करावा असेही सांगितले होते.मात्र जोडणीनंतर दोन दिवस विज नसल्याने ती मोटार चालू करता आली नाही.दोन दिवसानंतर तलावावर मोटार चालू करण्यासाठी कर्मचारी गेले असता मोटार चोरीला गेल्याचे आढळून आले.त्यांची रितसर तक्रार जत पोलिसात दिली आहे. त्यांनी पंचनामा करून तपास सुरू केला आहे. त्यामुळे सध्या नागरिकांना पाणी देताना अडचणी येत आहेत. असे यावेळी ग्रामपंचायत प्रशासनाकडून उपस्थित नागरिंकाना सांगण्यात आले. दरम्यान पोलिसांनी गतीने तपास करून मोटार चोरट्यांना शोधून काढावे अशी मागणी संरपच श्री.पोरे यांनी केली आहे. त्याशिवाय नागरिकांना पाणी टंचाई मुक्त करण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू असल्याचेही श्री.पोरे यांनी सांगितले.ग्रामसेवक श्री.माळी,सर्व सदस्य,मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
येळवीत पाणी टंचाईच्या पार्श्वभुमीवर विशेष ग्रामसभा संपन्न झाली.





