वळसंग | जिल्हा परिषद शाळेत भरला चिमुकल्यांचा आठवडा बाजार |

0
86

वळसंग,वार्ताहर:शाळेच्या आवारात भाजी मंडईची लगबग, ‘भाजी घ्या भाजी’ चा आरडाओरडा, गिऱ्हाईकांना आकर्षित करण्यासाठी विविध क्लृप्त्या हे सगळे वळसंग (ता. जत) येथे जिल्हा परिषद मराठी शाळा येथे घडून आले. येथील विद्यार्थ्यांनी शाळेतच आठवडा बाजार भरवला होता. यावेळी गावातील नागरिकांनी शाळेत येऊन बाजारातील पालेभाज्या खरेदी केल्या. वळसंग परिसरातील शेतकऱ्यांच्या मुलांनी आपल्या शेतातील भाजी-पाला बाजारात न पाठविता थेट शाळेत भरवलेल्या बाजारातच विकायला आणल्‍यामुळे शाळेत आठवडी बाजार भरला होता. गावकऱ्यांनी या आठवड्या बाजाराला गर्दी केली होती. या बाजारात विविध पालेभाज्या पासून ते फळे आणि सौंन्दर्य प्रसादने आदींचे दालन भरवण्यात आले होते.
यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती.जाधव म्हणाल्या की,मुलांना फक्त शालेय ज्ञान देण्यापेक्षा सभोवतालच्या समाज आणि व्यवहार ज्ञानाची माहिती व्हावी. आणि अशा उपक्रमातून मुलांना गणित, विज्ञान या विषयात शिकताना गोडी निर्माण व्हावी यासाठी हा अभिनव उपक्रम शाळेच्या वतीने भरवण्यात आला. उपक्रमास दिलेल्या प्रतिसाद बद्दल गावकऱ्यांचे आभार मानले. यावेळी केंद्र प्रमुख कांबळे सर,माजी मुख्याध्यापक जगताप सर, व सर्व शिक्षक सहकारी वर्ग उपस्थित होता.

वळसंग जिल्हा परिषद शाळेत भरला चिमुकल्यांचा आठवडा बाजार भरला होता.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here