जत | शहरात पुन्हा डेंगूचे थैमान |

0
5

जत,प्रतिनिधी:जत शहरात गेल्या दोन महिन्यापासून डेंग्यू, चिकुनगुनियाच्या साथीने थैमान घातले आहे. शहरातील खासगी रुग्णालयांतून रोज डेंग्यू, चिकुनगुनियाची लागण झालेल्या रुग्णांची गर्दी होताना दिसत आहे. मात्र पालिकेकडून मात्र शहरातील स्वच्छतेबाबत कोणतेच गांभीर्य दिसून येत नाही.चार दिवसापुर्वी एका लहानगींला डेंगूमुळे जीव गमवावा लागला आहे.तरीही प्रशासनाने स्वच्छतेबाबत उदाशीन दिसत आहे.
शहरातील सर्व भागांत औषध फवारणी तसेच जगजागृती करणे गरजेचे आहे. शहरातील साळे गल्ली,विजापूर-सातारा रोड लगतच्या परिसरात चिकुनगुनियाचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर आढळून आले आहेत.त्या परिसरात गटारी व्यवस्थित नसल्याने साडपांणी साटून राहत आहेत. त्यामुळे डासाची पैदास वेगाने होत आहे.
शहरात गेल्या दोन महिन्यांपासून चिकुनगुनियाच्या साथीने थैमान घातले आहे. तर काही प्रमाणात डेंग्यूचेही रुग्ण आढळून येत आहेत. तर याबाबत ग्रामीण रुग्णालयात कोणतीही अधिकृत नोंद नसल्याचे दिसून आले आहे. याचवेळी पालिकेकडे वाहन व्यवस्था नसल्याने अद्यापही पूर्ण शहरात औषध फवारणी झालेली नाही.पालिकेकडून साथ आटोक्यात आणण्यासाठी प्रत्यक्षात शहरात कुठेच कृती दिसून येत नसल्याने नाराजी व्यक्‍त होत आहे. शहरात त्वरित औषध फवारणी तसेच जनजागृती करण्याची गरज निर्माण झाली आहे.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here