डफळापूर, वार्ताहर: डफळापूर ता.जत येथील आंबेडकर नगर वाचनालय ते हनुमान मंदिर रस्त्याचे काम तातडीने करावे अन्यथा तीव्र अंदोलन करू असा इशारा ग्रा.प.सदस्य मुरलीधर शिंगे यांनी दिला आहे.
शिंगे पुढे म्हणाले,ग्रामपंचायतीच्या 14 व्या वित्त आयोगाच्या निधीतून आंबेडकर नगर वाचनालय ते हनुमान मंदिर कॉक्रीटीकरण काम मंजूर आहे.त्यासाठी ई-टेंडर करावे असा ठराव ग्रामपंचायतीच्या मार्च महिन्यातील मासिक सभेत घेण्यात आला आहे. पंरतू गेल्या चार महिन्यापासून त्यावर काहीही कारवाई होत नाही. त्यामुळे जुलैच्या मासिक सभेत हा विषय काढण्यात आला,त्यावेळी ग्रामविकास अधिकारी यांनी कागदपत्रे पुर्तता नसल्याने हे काम करता आले नाही पुढील बैठकी पर्यत हा विषय मार्गी लावू असे आश्वासन दिले. या रस्त्यावर सध्या खड्डे पडले आहेत. दलित वस्तीतील ग्रामस्थांचा वावर असलेला हा रस्ता आहे.त्यामुळे याकामाकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप शिंगे यांनी केला.तसेच ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा मनमानी कारभार सुरू आहे. स्वच्छतेचे कर्मचारी गटारीची स्वच्छता करत नसल्याने अनेक गटारी तुंबल्या आहेत.त्यामुळे डांसाची आश्रस्थाने तयार झाली आहे.
डेटा ऑफरेटरचा दोन वेळा पगार खर्ची
ग्रामपंचायतीकडे असणाऱ्या डेटाऑपरेटरचा दुहेरी पगार काढल्याचा आरोप शिंगे यांनी केला.डेटाऑपरेटर हा एका खाजगी कंपनीने नेमलेला कर्मचारी आहे.त्याला कंपनी पगार देते.ग्रामपंचायत कंपनीला पैसे भरते असा नियम आहे.पंरतू डफळापूर ग्रामसेवकांने संगनमत करून कंपनीलाही पैसे पाठविले आहेत. व पुन्हा थेट पगारही दिला आहे. त्यामुळे 90 हाजार रूपये ग्रामपंचायतीवर बुर्दड पडला आहे. त्याशिवाय अन्य कामातही मोठ्या घफला झाला आहे.मोठ्या प्रमाणात तक्रारी असलेल्या ग्रामसेवकांनी संगनमत करून मोठी रक्कमेचा गैरव्यवहार केला आहे. त्यांचा भांडाफोड लवकरचं करणार असल्याचे शिंगे म्हणाले.





