जत,(प्रतिनिधी):जत शहराला विविध आजारांनी ग्रासले असून नागरिक त्याने बेजार झाले आहेत. डेंगूने गेल्या दोन-तीन महिन्यांत चार जणांचा बळी घेतला असून त्यात आणखी एका लहान मुलीची भर पडली आहे. अवंतिका सागर साळे (वय 4, शिवाजी पेठ,जत) असे या मुलीचे नाव आहे.
अवंतिकाला ताप आला म्हणून तीन दिवसांपूर्वी जतमधील एका खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना आज दि.28 रोजी तिचा मृत्यू झाला. या घटनेमुळे जत शहरात खळबळ उडाली आहे. गेल्या दोन महिन्यांत शहरातील नागरिकांना चिकनगुण्या आणि डेंगूच्या साथीने बेजार करून टाकले आहे. घरटी एक-दोन रुग्ण हमखास आढळून येत आहेत. साथ आटोक्यात आणण्यासाठी नगरपालिका प्रशासन यंत्रणा व आरोग्य विभाग असमर्थ ठरत असल्याने लोकांमधून संताप व्यक्त होत आहे.जत नगरपरीषदेकडून सातत्यांने उपाययोजना होत नाहीत. परिणामी निवडणूकीत आधी मोटारसायकल वरून जाणारे लोकप्रतिनिधी चारचाकी गाडी शिवाय फिरत नसल्याने त्यांना नागरिकांच्या अडचणी समजणार कशा असा सतप्त सवाल उपस्थित होत आहे.
Home Uncategorized जत | चार वर्षाच्या मुलीचा डेंगूने मृत्यू शहरात खळबळ;चिकनगुणियाच्या साथीने नागरिक बेजार





