गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुुरुर्देवो महेश्वरा… गुरुविण कोण दाखविल वाट मोहन माळी इंटनॅशनल स्कूलमध्ये गुरू पौर्णिमा उत्साहात साजरी

0
11

कवटेमंहकाळ :
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुुरुर्देवो महेश्वर:… या महतीनुसार गुरुपौर्णिमेनिमित्त मोहन माळी इंटनॅशनल स्कूलमध्ये  विद्यार्थ्यांनी आपल्या गुरुजनांना वंदन केले.  गुरुपौर्णिमेनिमित्त मुर्ती पुजन व दीपप्रज्वलन करण्यात आले.यावेळी विद्यार्थ्यांनी रामदास स्वामी-शिवराय, द्रोणाचार्य-एकलव्य अशी गुरुशिष्याची वेशभूषा केली होती. यावेळी विद्यार्थ्यांनी गुरुजनांना गुलाबपुष्प देऊन शुभेच्छा दिल्या.गुरुशिष्य नात्यांबदल माहिती सांगितली.
अभिनव फाऊंडेशन संचलित मोहन माळी इंटरनॅशनल स्कूलमध्ये गुरूपौर्णिमा विविध नव उपक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरी झाली.कार्यक्रमाची सुरुवात जगतगुरू व्यासमुनींच्या प्रतिमा पूजनाने झाली.प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये ज्ञानरुपी अमृत देणाऱ्या गुरूला अनन्य साधारण महत्त्व असते .माता, पिता,गुरुजन, ग्रंथ,निसर्ग या गुरूंचे ऋण आपल्या संपूर्ण आयुष्यामध्ये फेडता न येण्यासारखे आहेत.गुरु सर्व शिष्यांना सदमार्ग दाखवतात. आपल्याला कर्तृत्वाच्या उच्च शिखरावर पोहोचवणारे आपले गुरुच असतात.व्यास मुनिवर्या सारखे गुरू साऱ्या जगाला परिचित आहेत.विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक नाटिका सादर करीत पुर्वाश्रमीचे चित्र उभे केले.प्राचार्या मा. सौ. कविता मेहरा यांनी गुरु महिमा वर्णिला.विद्यार्थ्यांना संस्काराची शिदोरी दिली .स्कूलमधील सर्व शिक्षकांना गुलाबपुष्प देऊन सन्मानित करण्यात आले.गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा देत सर्वांनी गुरुंप्रती आदरपूर्ण मनोभावना व्यक्त केल्या.

मोहन माळी इंटनॅशनल स्कूलमध्ये गुरू पौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here