बेवनूर, वाळेखिंडीला टेम्बूं योजनेत समावेशासाठी प्रयत्न : खा.संजय पाटील

0
25

जत,प्रतिनिधी: दुष्काळी जत तालुक्यातील पाणी,रस्ते सह मुलभूत प्रश्न सोडविण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहे. म्हैशाळ सिंचन योजनेला मोठा निधी मिळाला आहे, रस्त्याची कामेही मोठ्या प्रमाणात होत आहेत. त्यामुळे जत विकासाच्या टप्यात आले आहे,असे प्रतिपादन खा.संजय पाटील यांनी केले. त्यांनी बेवनूर येथे जनतेच्या समस्या जाणून घेतल्या.यावेळी जिल्हा बँक संचालक चंद्रकांत हाक्के,अॅड.प्रभाकर जाधव, जि.प.सदस्या स्नेहलता जाधव उपस्थित होते.
यावेळी बेवनुर गावाचा आढावा घेताना बेवनुर सह वाळेखिंडी, गुळवंची नवाळवाडी,या गावांचा टेंम्बू योजनेत समावेश करणे साठी पाठपुरावा चालू आहे व बेवनुर,नावळवाडी,वाळेखिंडी या गावांचा या योजनेत कसा समावेश करता येईल याविषयी अधिकाऱ्यांशी चर्चा झाली आहे. हे काम एक वर्षात पूर्ण करायची हमी दिली.अधिकाऱ्यांनी दिल्याचे खा.पाटील यांनी सांगितले.
त्याशिवाय वाळेखिंडी रेल्वे स्टेशनलाला सर्व गाड्या थांबण्याचे नियोजन करण्यात येईल,गुळवांची रेल्वे स्टेशन सुरु कारणासाठी पाठपुरावा करून लवकरच सुरु करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.हिवरे- वाळेेखिंडी कालवा रुंदीकरण करून वाळेखिंडी मार्गे सिंगनहळ्ळी पर्यंत म्हैशाळचे पाणी देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
घोरपडी व वालेखिंडी तलावाखालील खराब कॅनॉल दुरुस्त करण्यात येईल.बेवनुर ते घोरपडी रस्ता जिल्हा नियोजन मध्ये घेतल्याचे खा.पाटील यांनी सांगितले.त्याशिवाय बेवणुरचे ग्रामदैवत म्हसोबा देवस्थान क वर्ग तीर्थक्षेत्र म्हणून मंजूर करण्याचे आश्वासन दिले.प्रस्ताविक विनायक शिंदे यांनी केले तर आभार मारुती सरगर यांनी मानले. बेवणूचे सरपंच  दादासो वाघमोडे, वाळेखिंडचे सरपंच विजय पाटील , गुळवांचीचे सरपंच खटके सर,वाळेखिंडीचे एन.डी. शिंदे सर, भिमराव शिंदे,उपसरपंच तानाजी शिंदे, माजी सरपंच मारुती सरगर,कवठेमहांकाळ प. स. सदस्य विकास हक्के यांच्यासह बेवनुर,वाळेखिंडी,नावळवाडी,गुळवांची येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बेवनूर ता.जत येथे खा.संजय पाटील यांनी ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेतल्या.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here