जत, प्रतिनिधी:जतचे आमदार स्वतःच्या स्वार्थासाठी उपोषणाचे नाटक करून जनतेची दिशाभूल करत आहेत.त्यांना मतदान करून जनेतला पश्चाताप होत आहे, अशी टीका कॉग्रेस नेते विक्रम सांवत व तालुकाध्यक्ष आप्पाराया बिराजदार यांनी पत्रकार बैठकीत केली.
सावंत व बिराजदार म्हणाले, अामदारांच्या गावात उमदीचे सहा पोलिस निरीक्षक भगवान शिंदे यांनी कार्यकर्त्याच्या जुगार अडड्यावर छापा घालून बंद केला. त्याचा राग मनात धरून पोलिस प्रशासनावर दबाव टाकण्याचा प्रयत्न आमदारांचा आहे. केवळ स्वार्थापोटी उपोषण करणे म्हणजे हे आमदार जागताप यांचा नौटकींचा प्रकार आहे. खरे तर राज्यात मराठा,धनगर,लिंगायत,मुस्लिम,यां
अामदारांचे बगलबच्चे वाळु, तस्करी,जुगार,मटका, असे अवैध धंदे करीत आहे. त्यांच्यावर कोणतेही कार्यवाही करू नये यासाठी पोलिस प्रशासनाच्या विरोधात उपोषण कऱित आहेत.
राज्यात भाजप सरकार येऊन 4 वर्षे झाली आहेत. त्यात सरकार व निवडून आलेल्या आमदारांचा अनुभव जनतेने चांगला घेतला आहे. नोटा बंदी,फसवी कर्ज माफी, शेतीमालाला कवडी मोल किंमत यामुळे शेतकरी उध्वस्त करण्याचे पाप या सरकारचे आहे,
जतचे भाजप आमदार आपल्याच कार्यकर्त्यांचे अवैद्य धंदे चालू ठेवण्यासाठी पोलीसांवर दबाव टाकत आहेत. स्वतःच्या गावातील ग्रामपंचायत निवडणूकीत पराभव न पचल्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यावर खोटे गुन्हे दाखल करण्याकारिता पोलिसावर दबाव अणण्याचा प्रकार चालू आहे, अशी टीका केली.





