कोसारी,वार्ताहर: कोसारी ता.जत येते भारत निर्माण शासकीय पाणीपुरवठ्यच्या विहीरीत कोसारी येथील सौ. मीनाक्षी बबन भोसले(वय 42)यांचा संशयास्पद मृतदेह आढळून आला.
शुक्रवारी सकाळी 9 वाजनेच्या सुमारास शासकीय पाणीपुरवठ्यच्या विहीरीत मृतदेह तरंगताना दिसला. त्या बबन भोसले यांच्या पत्नी असून चार दिवसांपासून त्या बेपत्ता झाल्या होत्या त्यांनी मिनाक्षी हिची बेपत्ता झालेची तक्रार पोलिसात केली होती.दि.26 रोजी सकाळी मृतदेह संशयास्पद स्वरूपात सापडला त्या महिलेस पोहता येत असल्याने तिच्या घातपात झाल्याचा संशय तिच्या नातेवाईकांनी व्यक्त केला आहे. जत येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला





