जत,प्रतिनिधी : जत नगर परिषद हद्दीतील विकास कामांसाठी मुख्यमंत्री यांच्याकडे 8 कोटी 66 लाख रुपयांच्या निधीची मागणी आमदार विलासराव जगताप यांनी केली आहे.शहरातील प्रमुख समस्या असलेल्या शहरातील रस्त्यातील खड्ड्यातून नागरिकाची मुक्ती करण्यासाठी अखेर आमदार विलासराव जगताप यांनी प्रयत्न चालविले आहेत.दीड वर्षात कोणतेही ठोस काम न झाल्याने शहर विकासापासून दूर रहात आहे.खड्ड्यातील रस्त्यामुळे नागरिकांच्या मणक्याला दणके बसत आहेत.तर गटारी सुसज्ज नसल्याने साडपांणी वाहून न गेल्याने डासाचे सामाज्र वाढले आहे.त्यामुळे सतत साथीच्या आजाराचा विळखा शहराभोवती असतो.आता त्यातून येत्या काही महिन्यात सुटका होणार आहे.
शहरातील प्रमुख रस्ते,गटारी सह अनेक विकास कामे न झाल्याने शहर भकास झाले आहे. यांची दखल घेत आमदार विलासराव जगताप ही कामे मुख्यंमञी देवेंद्र फडणवीस यांना सुचविली आहेत.
काही दिवसापुर्वी आ.जगताप यांना सार्वजनिक बांधकाम विभाग व भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकांना शहरातील रखडलेल्या कामाची पाहणी करून कामे सुचविण्यास सांगितले होते. शहरातील महत्वाचे रस्ते, गटारी, कॉंक्रीटी करण याचा आढावा घेऊन आमदार विलासराव जगताप यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,व नगरविकास राज्यमंत्री रणजीत पाटील यांना 8 कोटी 66 लाख रुपयांच्या निधीची मागणी पत्राद्वारे केली या सर्व कामास लवकरच मंजुरी मिळणार असून शहर स्वच्छ, खड्डैमुक्त,होणार असल्याचे आ. जगताप यांनी सांगितले.
शहरातील शिवाजी पुतळा ते वाचनालय रस्ता गटार बांधणे व डांबरीकरण, वाचनालय ते मारूती मंदिर रस्ता गटार बांधणे व डांबरीकरण,शालिवाहन पट्टणशेट्टी(कागवाडे अॅटोमोबाईल)ते कोळी गल्ली दोन्ही बाजूचे रस्ता गटार बांधणे व डांबरीकरण,डॉ.वाघ ते बाळीकाई घर,उमराणी रस्ता दोन्ही बाजूचे रस्ता गटार बांधणे व डांबरीकरण,बाळीकाई घर ते बन्नेनवर घर दोन्ही बाजूचे रस्ता गटार बांधणे व डांबरीकरण,विजापूर रोड,संख घर ते सज्जन घर दोन्ही बाजूचे रस्ता गटार बांधणे व डांबरीकरण,
साळुंखे घर ते डॉ.गुरव हॉस्पिटल दोन्ही बाजूचे रस्ता गटार बांधणे व डांबरीकरण,बसवेश्वर मंदिर ते भारत कलाल यांचे दोन्ही बाजूचे
रस्ता गटार बांधणे व डांबरीकरण,जावेद नदाफ घर ते मल्लिकार्जून मोबाईल शॉपी ते एचडीएफसी बँक पर्यत दोन्ही बाजूचे रस्ता गटार बांधणे व डांबरीकरण,अष्टेकर गल्ली स्वामी घर ते शर्मा घर रस्ता क्रॉक्रीटीरण करणे,बाबूराव पट्टणशेट्टी घर ते संजू कोळी घरापर्यत रस्ता डांबरीकरण करणे,वासूदेव सांळुखे घर ते माळी घर रस्ता डांबरीकरण करणे,शिक्षक कॉलनी ते विजयकुमार महादेव माळी दोन्ही बाजूचे गटार व रस्ता कॉक्रीटीकरण करणे,मठपती सर घर ते श्रंध्दा निवास पर्यत दोन्ही बाजूचे गटार व कॉक्रीटीकरण,विज कामगार पतसंस्था ते शिंदे किराणा दुकान दोन्ही बाजूचे गटार बांधणे व डांबरीकरण,इदगाह मैदान ते घाडगेवाडी रोड पर्यत रस्ता डांबरीकरण करणे, ईगल अॅटोमोबाईल ते साळुंखे घरापर्यत दोन्ही बाजूचे गटार बांधणे व डांबरीकरण,बाळ नदाफ ते बालविद्यामंदिर दोन्ही बाजूचे गटार बांधणे व डांबरीकरण,महमद अलगूर घर ते संतोष माने घर रस्ता डांबरीकरण, बिरोबा मंदिर ते रफिक अलगूर घर रस्ता डांबरीकरण, दुर्योधन कोडक घर ते शहाजी भोसले घर गटार व रस्ता डांबरीकरण,मुलाणी सर घर ते सोहनी सर घर दोन्ही बाजूचे गटार व डांबरीकरण, जनावरा बाजारापासून कडी मळा रस्ता डांबरीकरण व कॉजवे बांधणे,कडी मळा ते अष्टेकर मळा रस्ता डांबरीकरण व सीडी वर्क बांधकाम, शिवाजी गावडे घरापासून ते शेगाव रोडपर्यत दोन्ही बाजूचे गटार व डांबरीकरण, वाघमोडे घरापासून ते सातारा रस्त्यापर्यत दोन्ही बाजूचे गटार व डांबरीकरण, श्रींमत साळे घर ते सतीश कोळी घरापर्यत दोन्ही बाजूचे गटार व डांबरीकरण, विलास बामणे घर ते अशोक पाटील घर दोन्ही बाजूचे गटार व डांबरीकरण, खोत सर घर ते बाळ भोसले घरापर्यत दोन्ही बाजूचे गटार व डांबरीकरण, उमराणी रोड(मोदी घर ते रेवणसिध्द मंदिर)दोन्ही बाजूचे गटार व डांबरीकरण, कॉजवे करणे,शिवाजी विकम घर ते गुरव हॉस्पिटल (विजापूर रस्ता) डांबरीकरण,शिवानुभव मंडप ते माडग्याळ घर रस्ता डांबरीकरण, महाराष्ट्र हॉटेल ते सवदे खत दुकान रस्ता डांबरीकरण, निलसागर लॉज ते महेश जाधव घर दोन्ही बाजूचे गटार व डांबरीकरण, महाजन वकील ते राम पवार प्लॅट दोन्ही बाजूचे गटार व डांबरीकरण,उदगीर सर घर ते गणेश खोत यांच्या घरापर्यत दोन्ही बाजूचे गटार व डांबरीकरण ही कामे होणार आहेत.त्यासाठी साडे आठ कोटीच्या निधीची मागणी करण्यात आली आहे.





